भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी या दिग्गज खेळाडूने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मात्र त्यांनी आपल्यावर टीका होऊ नये म्हणून, एका गोष्टीवर बोलण्याचे टाळले आहे.
भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर हे अजिंक्य रहाणेच्या क्षेत्ररक्षण लावण्याच्या शैलीने खूप प्रभावित झाले आहेत. मात्र, त्यांनी तरीही अजिंक्य रहाणेबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. कारण आता जर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली, तर खूप घाई केल्यासारखे होईल, असे गावसकर म्हणाले. त्याचबरोबर मुंबईकर खेळाडूचे समर्थन केल्यासारखे होईल. त्यामुळे गावसकर यांनी अजिंक्य रहाणेबद्दल प्रतिक्रिया देणे टाळले.
नियमितपणे भारतीय संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली सध्या पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे दुसर्या कसोटी सामन्यात नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करत आहे. त्याचबरोबर उर्वरीत दोन कसोटी सामन्यात सुद्धा अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना दिसून येईल. दुसर्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्त्व गुणांची झलक दाखवताना भारतीय गोलंदाजांचा योग्य प्रकारे वापर केला.
अजिंक्य रहाणेने चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असलेल्या मार्नस लॅब्यूशानेला रोखण्यासाठी नवीन चाल आखली. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू दिला. त्याने ही आपल्या कर्णधाराच्या निर्णयाचे सार्थक करताना लॅब्यूशानेची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने पहिल्या 10 षटकानंतर लगेच अश्विनच्या हाती चेंडू दिला. अश्विनने संघाच्या तेराव्या षटकात मॅथ्यू वेडला तंबूत धाडले.
अजिंक्यच्या नेतृत्त्वाबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, “इतक्या लवकर निष्कर्षावर पोहोचायला नको. जर मी म्हणालो त्याने चांगली कामगिरी केली, तर माझ्यावर मुंबईकर खेळाडूचे समर्थन केल्याचे आरोप होतील आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडतील.” ते सोनी नेटवर्कवर बोलताना म्हणाले, “त्यामुळे मला यामध्ये पडायचे नाही कारण ही सुरुवात आहे.”
गावसकर म्हणाले की, अजिंक्यने लावलेल्या ठिकाणी खेळाडूने स्मिथ, लॅब्यूशाने यांचे चांगले झेल घेतले. जर गोलंदाज क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करतो, तेव्हा आजच्यासारखे होते आणि कर्णधार चांगला ठरतो. ते म्हणाले, “मागील दोन कसोटी आणि वनडेत सामन्यात ज्याप्रकारे क्षेत्ररक्षण लावले होते, त्यावरून समजते की त्याला माहीत आहे की, क्षेत्ररक्षण कुठे लावायचे. त्याच प्रकारे गोलंदाजी झाली, तर कर्णधार यशस्वी होतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या दिवसाच्या कामगिरीनंतर दिग्गज भारतीय संघावर खुश, ट्विट करत केले कौतुक
नादच खुळा! बीबीएलमध्ये ‘या’ संघाने रचला इतिहास; मिळवला टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय
‘क्या करू मर जाऊ’, अजिंक्य रहाणेच्या शानदार नेतृत्त्वावर विराट कोहली ट्रोल; पाहा भन्नाट मिम्स