बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या १७ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. जगातील दोन बलाढ्य संघामध्ये होणाऱ्या या मालिकेचे थेट प्रसारण १२० पेक्षा अधिक देशांमध्ये होणार आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, १२० पेक्षा अधिक देशांमध्ये मालिकेचे थेट प्रसारण आणि स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. हे कोणत्याही द्विपक्षीय क्रिकेटसाठी सर्वात मोठे प्रसारण आहे, जे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेपेक्षाही मोठे आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत कसोटी मालिकेचे प्रसारण या चॅनेलवर होईल
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील कसोटी मालिकेचे थेट प्रसारण आणि स्ट्रिमिंग भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे अधिकृत प्रसारक सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्क करेल. भारतात या मालिकेचे प्रसारण ४ भाषांमध्ये होणार आहे.
कसोटी सामन्यांचे लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह प्रसारण सोनी टेन-१वर इंग्रजीमध्ये, सोनी टेन-३ वर हिंदीमध्ये आणि सोनी सिक्स चॅनेलवर इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू भाषेत सकाळी ८.३० वाजता केले जाणार आहे.
मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिववर असेल उपलब्ध
जवळपास निश्चित झाले आहे की, ऍडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांची जोडी सलामीला डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरेल. याव्यतिरिक्त डेविड वॉर्नर दुखापतीमुळे या कसोटी सामन्यात खेळणार नाही.
भारतीय कसोटी संघासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे विराटचा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर तो पालकत्व रजा घेऊन भारतात परतेल. दुसरीकडे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अशाप्रकारे असेल ऑस्ट्रेलिया संघ-
जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्यूशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरॉन ग्रीन, टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेजलवूड
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडला मोठा धक्का! ‘हा’ धडाकेबाज खेळाडू दीड महिन्यासाठी संघातून बाहेर
‘भारतीय गोलंदाजांनी जास्त उताविळपणा दाखवू नये’, कपिल देव यांचे सूचक विधान
‘टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाज लवकर गुडघे टेकतात,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूचे रोखठोक मत
ट्रेंडिंग लेख-
कमालच! एबी डीविलियर्सच्या आधी ‘या’ ३ खेळाडूंनी केली होती विचित्र शॉट्स खेळण्याची सुरुवात
पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून कोण करणार ओपनिंग?, विराट समोर ‘हे’ ५ पर्याय






