भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली असून दुसरा सामना सिडनी येथे झाला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मोठा कारनामा आपल्या नावावर केला आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत ३८९ धावा केल्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने ८७ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००० धावा पूर्ण केल्या.
विराटला हा टप्पा गाठण्यासाठी ४० डावांची आवश्यकता लागली. सोबतच तो सचिन तेंडुलकर, विवियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
यापूर्वी असा कारनामा डेसमंड हेन्स, रिचर्ड्स, तेंडुलकर, रोहित शर्मा यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत २००० धावा करणारे खेळाडू
डेसमंड हेन्स
विवियन रिचर्ड्स
सचिन तेंडुलकर
रोहित शर्मा
विराट कोहली*
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्माने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये करावे भारतीय संघाचे नेतृत्व”
संकटमोचक पांड्या ! शतकवीर स्मिथला तंबूत धाडत हार्दिकचे जोरदार पुनरागमन
ट्रेंडिंग लेख-
भारताविरुद्ध ५ वे शतक ठोकणाऱ्या स्मिथचे सचिन, पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान
अफलातून! दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या २३ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळीसह केला भारी रेकॉर्ड
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज