आज (8 मार्च) मेलबर्न येथे महिला दिनाच्या मुहूर्तावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (INDWVsAUSW) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) अंतिम सामना होणार आहे.टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे.
यापुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आंतरराष्ट्रीय महिला टी20 (T20I) प्रकारात 19 वेळा आमनेसामने आले आहेत. या 19 सामन्यांपैकी अवघ्या 6 सामन्यात भारतीय संघाला विजेतेपद मिळवता आले आहे. तर, ऑस्टेलिया संघाने भारतीय विजयाच्या दुप्पटीपेक्षा एक अधिक म्हणजेच 13 वेळा विजय मिळवला आहे.
या 6 विजयांपैकी 2 विजय हे भारताने या वर्षीच मिळवले आहेत. या वर्षी भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषकाआधी पार पडलेल्या महिला टी20 तिरंगी मालिकेच्या एका सामन्यात आणि आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे.






