---Advertisement---

जडेजाच्या हैं तो मुमकिन हैं, पहा जडेजाने केलेला अफलातून रनआऊट

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 10:42 AM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा नेहमीच त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत असतो. त्याचप्रमाणे तो पुन्हा एकदा गुरुवारी (14 नोव्हेंबर) होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे सुरु झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजाला केलेल्या अफलातून धावबादमुळे चर्चेत आला आहे.

बीसीसीआयनेही त्याने क्षेत्ररक्षणात दाखवलेल्या चपळाईचा व्हिडिओ अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.

झाले असे की या सामन्यात बांगलादेश प्रथम फलंदाजी करत असताना 57वे षटक उमेश यादव टाकत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाने बांगलादेशच्या तैजुल उस्मानला (Taijul Usman) धावबाद करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो चेंडू स्टंम्पला लागण्याऐवजी बाऊंड्री लाईनच्या दिशेने गेला आणि बांगलादेशच्या संघाला अतिरिक्त 5 धावा मिळाल्या. त्याचबरोबर भारताला धावबादची संधीही गमवावी लागली.

पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर जडेजाने कोणतीही चूक न करता क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवत यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या मदतीने तैजुल उस्मानला धावबाद केले. उस्मानने या षटकातील चौथ्या चेंडूवर गलीच्या दिशेने चेंडू फटकावला.

त्यानंतर अबू जाएद आणि तैजूल उस्मानने पहिली धाव जलद गतीने घेतली आणि ते दुसरी धाव घेण्यासाठी धावले. परंतू यावेळी जडेजाने कोणतीही चूक न होऊ देता यष्टीरक्षक वृद्धीमान साहाकडे चेंडू फेकला. साहानेही तैजूल खेळपट्टीवरील क्रीझवर पोहोचण्यापूर्वीच स्टंम्पवरील बेल्स उडवले. त्यामुळे बांगलादेशला तैजूलच्या रुपात 9वी विकेट गमवावी लागली.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवरच संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 1 बाद 87 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---