---Advertisement---

IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार

On: सोमवार, सप्टेंबर 23, 2024 5:43 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला क्लीन स्वीप दिलेल्या बांगलादेश संघाचा 280 धावांनी धुव्वा उडवला. आता भारत-बांगलादेश संघातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळवला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ तयारी करत आहेत. तत्पूर्वी कानपूरच्या मैदानावरील भारतीय संघाचे रेकाॅर्ड जाणून घेऊया.

भारतीय संघ 2021 नंतर पहिल्यांदाच कानपूरच्या मैदानावर उतरणार आहे. आता बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये विजय मिळवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघ 41 वर्षांपासून कानपूरमध्ये एकही कसोटी सामना हारला नाही. या मैदानावर शेवटचा सामना 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. तेव्हापासून भारतीय संघ कानपूरमध्ये अजिंक्य आहे. हे रेकाॅर्ड बांगलादेशसाठी चांगला नाही. पहिल्या सामन्यातील पराभवाने त्रस्त झालेला पाहुणा संघ हा रेकाॅर्ड पाहून घाबरून जाईल. भारतीय संघ कानपूरमध्ये 8 वर्षांपासून जिंकलेला नाही. या मैदानावर त्यांचा शेवटचा विजय 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झाला होता.

त्यानंतर 2021 मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध सामना झाला तेव्हा तो अनिर्णित राहिला. 1952 पासून भारताने कानपूरमध्ये 23 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान 7 सामने जिंकले आहेत. 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर 13 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारताने बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी जो संघ होता, तोच संघ दुसरा कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक) ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशला दुसरा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू होणार बाहेर?
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे बुमराहबद्दल मोठे वक्तव्य
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांची कसोटी कारकीर्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---