भारत-बांगलादेश चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशनं 4 गडी गमावून 158 धावा केल्या. संघाला विजयासाठी अद्याप 357 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 81 धावा केल्या होत्या. टीम इंडियानं आपला दुसरा डाव 287 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशसमोर 515 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. आता बांगलादेश विजयापासून 357 धावा दूर आहे, तर भारताला विजयासाठी आणखी 6 विकेट्सची आवश्यकता आहे.
भारताकडून तिसऱ्या दिवशी शुबमन गिल आणि रिषभ पंत यांनी 81 धावांवरून खेळ सुरू केला. या दोघांनी आपापली शतकं पूर्ण केली. पंतनं 109 धावांच्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार मारले. गिल पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात तो 119 धावा करून नाबाद परतला. गिल आणि पंत यांच्यात 167 धावांची भागीदारी झाली. त्याचवेळी केएल राहुलनं 19 चेंडूत 22 धावांची झटपट खेळी करत भारताचा आघाडी 500 च्या पुढे नेली.
बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 149 धावांवर आटोपला होता. त्यामुळे भारताला 218 धावांची मोठी आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवशी स्कोअरबोर्डमध्ये 287 धावांची भर पडल्यानंतर भारताची एकूण आघाडी 514 धावांची झाली. बांगलादेशला दुसऱ्या डावात विजयासाठी 515 धावांचं लक्ष्य मिळालं.
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. हसन आणि इस्लाम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली. मात्र नंतर विकेट झपाट्यानं पडत गेल्या. दिवसअखेर संघाचा स्कोर 4 विकेटवर 158 धावा आहे. मुशफिकुर रहीम चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, परंतु केएल राहुलनं त्याचा उत्कृष्ट झेल घेतला. मुशफिकुर 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो (51) आणि दिग्गज शाकिब अल हसन (5) क्रीजवर आहेत.
हेही वाचा –
दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! या 5 खेळाडूंना करणार रिटेन; रिषभ पंतबाबत मोठं अपडेट
केएल राहुलचा झंझावाती विक्रम, केवळ खास खेळाडूच करू शकतात अशी कामगिरी
नतमस्तक! शतक होण्यापूर्वी रिषभ पंतने केली क्रिकेटकीटची पूजा; पाहा VIDEO