टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 मधील भारताचा दुसरा सामना आज (22 जून) बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. दोन्ही संघातील हा चुरशीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम,अँटिग्वा येथे खेळवला जाईल. भारत आणि बांग्लादेश संघातील दोन्ही खेळाडूंमधील क्रिकेट मैदानांत झालेले वाद आपण या आधी पाहायला मिळाले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी क्रिकेटच्या मैदानावर नेहमी शांत असतो पण एक वेळ अशी आली जेव्हा बर्फासारखा थंड असलेल्या माहीला कुणाला तरी धडा शिकवावा लागला..
अत्यंत शांत असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीत असे क्वचितच घडले असेल जेव्हा तो रागावला असेल, परंतु एकदा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने त्याच्या कृतीमुळे धोनीला राग दिला होता. मात्र, त्यासाठी त्याला मोठी किंमतही मोजावी लागली.
Mustafizur Rahman!! Great collision for Dhoni and CSK. Ohh sorry I mean addition 😂#IPLAuction #IPL2024Auctionpic.twitter.com/VQQfUWo5pO
— Shrey (@Shrey__123) December 19, 2023
हा विषय जून 2015 चा आहे. जेव्हा टीम इंडिया यजमान बांग्लादेश विरुद्ध मिरपुर येथे एकदिवसीय सामना खेळत होती. भारताच्या फलंदाजी दरम्यान मुस्ताफिजुर रहमान सरखा सारखा फलंदाज धावा घेताना त्यांच्या वाटेवर आड घालत होता. यादरम्यान रोहित शर्माने त्याला ताकीदही दिली, मात्र त्यानंतर अंपायरने येऊन प्रकरण शांत केले. पण मुस्तफिजुर रहमानने आपली कृत्ये सोडली नाहीत आणि फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या मार्गात उभा राहिला, परंतु यावेळी धोनीला राग आला आणि त्याने मुस्तफिझूर रहमानला जोरदार फटका मारुन धाव पूर्ण केली.
गोलंदाजी केल्यानंतर मुस्तफिजुर रहमान वारंवार क्रीझवर फलंदाजांच्या लाईन मध्ये येत होता आणि धोनीला धावताना खूप अडचण येत होती, त्यामुळे धोनीने मुस्तफिजूरला धडा शिकवण्यासाठी धोनीने जोरदार धावताना त्याला धडक मारली. ही घटना पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटले, कारण धोनी सहसा रागावत नाही आणि तो असे करतही नाही. या प्रकरणामुळे धोनीला मॅच फीच्या 75% आणि मुस्तफिझूरला 50% दंड ठोठावण्यात आले होते.
महत्तवाच्या बातम्या-
भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? आजच्या सामन्यात हवामानाची स्थिती कशी असेल?
वेस्ट इंडिजचा कमबॅक! अमेरिकेला धूळ चारत बदललं सेमीफायनलचं समीकरण
आयसीसीचं शिक्कामोर्तब! पाकिस्तानातच होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतीय संघ जाणार का?