पुढील महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच टी20 मालिकेसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
त्याचबरोबर शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे या फलंदाजांचा टी20 संघात समावेश आहे. तसेच यष्टीरक्षक रिषभ पंतलाही संधी देण्यात आली आहे.
तर गोलंदाजांच्या फळीत वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, दिपक चाहर, खलील अहमद आणि शार्दूल ठाकूर यांचा समावेश आहे.
विराटला टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असली तरी तो कसोटी मालिकेत खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेला 15 जणांचा कसोटी संघच बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कायम करण्यात आलेला आहे.
त्यामुळे फलंदाजांच्या फळीत विराटसह, रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिल यांच्या समावेश आहे. तर हनुमा विहारी, रविंद्र जडेजा यांचा अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
गोलंदाजांच्या फळीत आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षणासाठी रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा यांचा पर्याय आहे.
बांगलादेश विरुद्ध 3 नोव्हेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे आणि कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल.
बांगलादेश विरुद्ध टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.
India’s squad for T20I series against Bangladesh: Rohit Sharma(Capt), Shikhar Dhawan, KL Rahul, Sanju Samson, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant(wk), Washington Sundar, Krunal Pandya, Yuzvendra Chahal, Rahul Chahar, Deepak Chahar, Khaleel Ahmed, Shivam Dube, Shardul Thakur
— BCCI (@BCCI) October 24, 2019
बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत
India’s squad for Test series against Bangladesh: Virat Kohli (Capt), Rohit Sharma, Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Hanuma Vihari, Saha (wk), R Jadeja, R Ashwin, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Umesh Yadav, Ishant Sharma, Shubman Gill, Rishabh Pant#INDvBAN
— BCCI (@BCCI) October 24, 2019






