आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघातील दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा भारत आणि बांगलादेशचा कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे.
भारतीय खेळाडू करु शकतात हे विक्रम –
– विराट कोहलीने या सामन्यात 32 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कसोटी कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण करेल. हा टप्पा पार करणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार तर जगातील 6 वा कर्णधार ठरले.
– भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने या सामन्यात 142 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कसोटीमध्ये 1000 धावा पूर्ण करेल. तसेच त्याने जर या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात या धावा पूर्ण केला तर तो सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या डॉन ब्रॅडमनची बरोबरी करेल.
ब्रॅडमन यांनी 13 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर सध्या मयंकच्या 12 कसोटी डावात 858 धावा आहेत.
– या सामन्यात जर चेतेश्वर पुजाराने 2 किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेतले तर तो कसोटीमध्ये 50 झेल घेण्याचा टप्पा पार करेल.
– यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने जर या सामन्यात यष्टीमागे 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतली तर तो कसोटीमध्ये यष्टीमागे 100 विकेट्स पूर्ण करेल. तसेच हा टप्पा पार करणारा 5 वा भारतीय यष्टीरक्षक ठरेल.
– रविंद्र जडेजाने या सामन्यात 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात 250 विकेट्सचा टप्पा पार करेल. तसेच भारतात 250 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा 5 वा भारतीय गोलंदाज ठरेल.
ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
वाचा👉https://t.co/qnGWVdu4ef👈#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019
विंडीज विरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी टीम इंडियाची झाली निवड
वाचा👉https://t.co/VKSditAu3F👈#म #मराठी #INDvsWI #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 21, 2019