---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश मोठी लढत, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार?

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 9:44 PM
Shubman Gill & Virat Kohli
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघात कराचीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईमध्ये 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये काही खेळाडूंची जागा पक्की आहे . शुबमन गिल सलामीवीर म्हणून संघात खेळणार आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सुद्धा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाची फलंदाजी खूप तगडी आहे. रोहित शर्माने आत्ताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेत शतकी खेळी केली होती. तसेच आत्ताच्या आगामी सामन्यांमध्ये रोहित आणि शुभमन गिल ओपनिंग करू शकतात. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो , त्याचबरोबर श्रेयस अय्यरने त्याची धमाकेदार खेळीची झलक आधीच दाखवलेली आहे. श्रेयसने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत धमाकेदार खेळी केली होती. श्रेयसला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते.

मध्यम क्रमांकावर के एल राहुल आणि हार्दिक पांड्या संघ सांभाळू शकतात. भारतीय संघात ऋषभ पंतची जागा संकटात आहे. त्याच्या जागी राहुल खेळताना दिसू शकतो भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दुबई जाण्यापूर्वी या गोष्टीचा संकेत दिला होता. अष्टपैलू हार्दिक पांड्या सोबत रवींद्र जडेजा सुद्धा मैदानावर खेळताना दिसू शकतो.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणाने संघाबाहेर झाला आहे. पण तरी त्याच्याशिवाय भारतीय संघाची गोलंदाजी विरोधी संघासाठी घातकी ठरू शकते. मोहम्मद शमी भारतीय संघातील सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यासोबत अर्शदीप सिंगला सुद्धा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, तसेच कुलदीप यादव आणि अक्षर पटेल दुबई मध्ये खेळताना दिसू शकतात.

चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी

 

हेही वाचा 

कोहलीच्या ‘जुगाड’ने बीसीसीआयच्या नव्या नियमांचे केले उल्लंघन? जाणून घ्या प्रकरण

क्रिकेटच्या मैदानात महान खेळाडूचे पुनरागमन, जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या संघासाठी खेळणार

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळणार संधी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---