आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवार, 2 नोव्हेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील लढत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा विजय महत्वाचा असणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर मात्र भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. चला तर या सामन्यातील हवामान अंदाजाविषयी जाणून घेऊया.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील बुधवारी खेळला जाणारा सामना एडिलेड याठिकाणी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या सामन्यावेळी एडिलेडमध्ये पावसाशी शक्यता वर्तवली गेली आहे, जी भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. बांगलादेशचे आव्हान तसे पाहिले तर भारतीय संघासाटी सोपे दिसत आहे. अशात सामना जर पावसामुळे रद्द करावा लागला, तर संघाला एक गुण कमी मिळेल. सामना जिंकल्यानंतर संघाला गुणतालिकेत दोन गुण मिळतात, पण जर सामना रद्द करावा लागला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जातो.
एडिलेडमध्ये मंगळवारी म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी पाऊस झाला आहे. पण बुधवारी सकाळी पावून थांबल्याचे दिसते. असे असले तरी, आकाशात ढग दाडल्याचे दिसत आहे. तसेच याठिकाणची थंडी देखील वाढली आहे. हवामान अंदाजाने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार एडिलेडमध्ये दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान बावसाची शक्यता सांगितली आहे. तसेच सायंकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत पावसाची शक्यता कमी असेल. ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार भारताचा सामना सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे.
अशात हवामान अंदाज विचार घेतला तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्यात पाऊस येण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु सामना निकाली निघेल एवढा खेळ नक्कीच होऊ शकतो. भारताला हा सामना जिंकणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्यांना पुढचा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळायचा आहे. मेलबर्नमध्ये टी-20 विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत चार सामन्यांदरम्यान पावसाने हजेरी लावली आहे, ज्यापैकी तीन सामने रद्द करावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईसह या चार संघांनी मारली मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मजल; असे रंगणार सामने
सुरेश रैना पुन्हा पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस! अबू धाबी टी-10 लीगमध्ये ‘या’ संघासोबत केला करार