---Advertisement---

मुंबईसह या चार संघांनी मारली मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मजल; असे रंगणार सामने

On: मंगळवार, नोव्हेंबर 1, 2022 10:57 PM
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने मंगळवारी (1 नोव्हेंबर) खेळले गेले. या चारही सामन्यात सर्व संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस मुंबई, हिमाचल प्रदेश, पंजाब व विदर्भ यांनी विजय मिळवत उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचे सामने कोलकाता येथे खेळले जातील.

https://twitter.com/BCCIdomestic/status/1587465216723673088?t=8FuDgHlShq84tWXAV6m-aw&s=19

 

पंजाब आणि कर्नाटक यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. पंजाबने शुबमन गिलच्या 126 व अनमोलप्रीतच्या 56 धावांच्या जोरावर 225 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकसाठी मनीष पांडे (45), अभिनव मनोहर (62) व‌ कृष्णप्पा गौतमच्या 30 धावांच्या जोरावर 216 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे पंजाबने नऊ धावांनी विजय साजरा केला.

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत बंगाल व हिमाचल प्रदेश यांच्यातील सामन्यातही मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. बंगालने अष्टपैलू शहाबाज अहमद याच्या तुफानी अर्धशतकाच्या तसेच इतर फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर 199 धावा धावफलकावर लावल्या. या धावांचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेशसाठी आकाश वशिष्ठ (76) व निखिल गंगता (50) यांनी शानदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. हिमाचल प्रदेश संघ प्रथमच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

विदर्भ आणि दिल्ली यांच्यातील सामना देखील चांगलाच रंगतदार झाला. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना अक्षय वाडकरच्या अर्धशतकाच्या जोरावर 156 धावा जमविल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला अखेरच्या चेंडूवर एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.

अखेरचा सामना देखील सर्व सामन्यांप्रमाणेच रंगतदार ठरला. सौराष्ट्राने या सामन्यात प्रेरक मंकडच्या अर्धशतकाच्या जोरावर 166 धावा धावलकावर लावलेल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईचे गडी नियमित अंतराने बाद झाले. मात्र, शिवम दुबेने अखेरपर्यंत नाबाद राहत 13 चेंडूवर 25 धावा करत संघाला दोन गडी राखून विजय मिळवून दिला.

पहिल्या उपांत्य सामन्यात पंजाबचा सामना हिमाचल प्रदेशशी होईल. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई व विदर्भ आमने-सामने येतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघड असतं बाबा! संघातील खेळाडूंना असा हाताळतो रोहित? स्वतःच केला खुलासा
सुरेश रैना पुन्हा पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस! अबू धाबी टी-10 लीगमध्ये ‘या’ संघासोबत केला करार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---