इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये धमाका करणारा भारतीय दिग्गज सुरेश रैना आता विदेशी लीगमध्येही खेळताना दिसणार आहे. अबू धाबी टी-10 लीगच्या आगामी हंगामात सुरेश रैना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यासाठी तयार झाला आहे. आगामी हंगामात खेळण्यासाठी रैनाने अबू धाबी टी-10 लीगमधील संघासोबत करार देखील पक्का केला आहे.
अबू धाबी टी-10 लीग (Abu Dhabi T10 League) मागच्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत राहिली आहे. चाहते या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. यावर्षी या लीगचा पहिला हंगाम असून सुरेश रैना (Suresh Raina) सारखे दिग्गज यामध्ये खेळताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरेश रैना हे नाव खूप मोठे आहे. रैनाने भारतीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. तो भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा देखील भाग राहिला आहे. आयपीएलमधील त्याची आकडेवारी देखील जबरदस्त आहे. चार वेळचा आयपीएल विजेता संघ सीएसकेचा तो महत्वाचा खेळाडू होता.
मागच्या वर्षी आयपीएलमध्ये एकही खरेदीदार मिळाला नसल्यामुळे रैनाची निराशा झाला होता. त्याने काही महिन्यांपूर्वी आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता तो अबू धाबी टी-10 लीगमध्ये खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. डेक्कन ग्लॅडिएटर्स संघासाठी तो खेळणार असल्याचे सांगितले गेले आहे. रैनासोबत या लीगमध्ये आंद्रे रसेल, निकोलस पूरन, जेसन रॉय, तस्कीन अहमद, ओडियन स्मिथ आणि मुजीब उर रहमान हे खेळाडू खेळताना दिसतील.
https://twitter.com/T10League/status/1587399070607441921?s=20&t=zWbqN10-y1jyeTj2EtyN-w
रैना नुकताच काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजेंड्स संघासाठी खेळताना दिसला होता. त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द मोठी राहिली आहे. भारतीय संघासाठी रैनाने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये योगदान दिले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 18, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 226 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 78 सामने खेळले आहेत. अबू धाबी टी-10 लीगची सुरुवात 23 ऑक्टोबर पासून होणार आहे. रैनाचा ग्लॅडिएटर्स संघ त्यांचा पहिला सामना अबू धाबी संघाविरुद्ध खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तेजतर्रार! आपल्या गोलंदाजीने अक्षरशः आग ओकतोय वूड; आता टाकला ‘या’ वेगाने चेंडू
‘बटलर शो’नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार






