भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (3 Matches T20 Series) पहिले दोन सामने पार पडले आहेत. या सामन्यातील दिल्लीत(Delhi) झालेला पहिला सामना बांगलादेशने 7 विकेट्सने जिंकला होता. तर, दुसरा सामना राजकोटमध्ये (Rajkot) भारताने 8 वकेट्सने जिंकला होता.
या दोन्ही सामन्यात रिषभ पंतला (Rishabh Pant) खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पंतचे समर्थन केले आहे.
“रिषभ पंतबद्दल प्रत्येक दिवशी, प्रत्येक मिनिटाला चर्चा केली जात आहे. मला असे वाटते की पंतला मैदानावर जे काही करायचे आहे ते करू द्यायला पाहिजे. मी प्रत्येकाला विनंती करतो की काही काळासाठी पंतला दुर्लक्षित करा,” असे बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी रोहित म्हणाला.
“पंत एक निर्भीड क्रिकेटपटू आहे. आम्हाला त्याला त्याचे स्वातंत्र्य द्यायचे आहे. जर तुम्हीही काही काळासाठी त्याला दुर्लक्षित केले तर, तो यापेक्षाही चांगली कामगिरी करू शकतो,” असेही रोहित म्हणाला.
पंतकडून मागील दोन सामन्यात यष्टीरक्षणामध्ये काही चूका झाल्या आहेत. तसेच त्याला बांगलादेश विरुद्ध पहिल्या टी20मध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. त्या सामन्यात त्याने 26 चेंडूत 27 धावा करुन बाद झाला होता. त्यानंतर त्याच्यावर सातत्याने टिका होत आहे.
“पंत आता 22 वर्षांचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) तो स्वत:चे नाव करण्याचा प्रयत्न करत आहे. तो मैदानात जे काही करतो त्यावर क्रिकेटचे चाहते लगेच बोलतात. हे काही योग्य नाही. मला असे वाटते की आपण त्याला त्याचे क्रिकेट खेळू द्यायला पाहिजे. जे त्याला खरंच करायचे आहे,” यावेळी नाराजी व्यक्त करताना रोहित असे म्हणाला.
आज होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात कोण मारणार बाजी?
वाचा 👉 https://t.co/ofIO8MHHpl 👈 #म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi
@BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम करण्याची रोहित शर्माला आज सुवर्णसंधी
वाचा 👉 https://t.co/Y2NhzNLzZS 👈 #म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi
@BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019