भारत विरुद्ध बांगलादेश टी20 विश्वचषक 2024 चा 47वा सामना आज (शनिवार, 22 जून) अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. आपला दुसरा सुपर-8 सामना जिंकून भारत उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकू इच्छितो, तर बांगलादेशच्या संघाचं लक्ष्य विजयासह स्पर्धेत टिकून राहण्याकडे असेल. अशा परिस्थितीत आज अँटिग्वामधील हवामान कसं असेल हे जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात पावसामुळे व्यत्यय येईल का? हे जाणून घेण्यासाठी अँटिग्वाच्या हवामानाची स्थिती जाणून घेऊया.
भारत विरुद्ध बांगलादेश सामना अँटिग्वा येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. Accuweather च्या अहवालानुसार, सकाळी 10-11 वाजता पावसाची 50 टक्के शक्यता आहे. यानंतर हवामान स्वच्छ होईल आणि सूर्यप्रकाश येईल. याचा अर्थ पावसामुळे सुरुवातीला व्यत्यय येऊ शकतो, परंतु सामना पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे.
या मैदानावर बांगलादेशने आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि ऑस्ट्रेलियानं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजय मिळवला होता.
भारत विरुद्ध बांगलादेश हेड टू हेड
टी20 क्रिकेटमध्ये भारताचं बांगलादेशवर वर्चस्व आहे. उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या 14 पैकी 13 सामने टीम इंडियानं जिंकले आहेत, तर बांगलादेशनं भारतीय संघाला फक्त एकदाच पराभूत केलंय. टी20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये एकूण चार लढती झाल्या असून प्रत्येक वेळी भारतीय संघ जिंकला आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यातही भारताचा वरचष्मा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजचा कमबॅक! अमेरिकेला धूळ चारत बदललं सेमीफायनलचं समीकरण
आयसीसीचं शिक्कामोर्तब! पाकिस्तानातच होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतीय संघ जाणार का?
दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं! इंग्लंडवर बाहेर पडण्याचा धोका