भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने या कसोटीसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर केएल राहुल रिषभ पंतचेही प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास, युवा यश दयाल, लेगस्पिनर कुलदीप यादव, मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप यांना प्रतीक्षा करावी लागेल. या सर्वांना चेन्नई कसोटीत बेंचवर बसावे लागू शकते.
एकेकाळी कसोटी क्रिकेटमध्ये ओपनिंग करणारा केएल राहुल पहिल्यांदाच वेगळ्या फॉर्ममध्ये दिसणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर भरपूर धावा केल्यानंतर आता राहुल कसोटी क्रिकेटमध्येही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसु शकतो. रिषभ पंतचे पुनरागमनही निश्चित आहे. अशा स्थितीत ध्रुव जुरेलला बाकावर बसावे लागणार आहे.
प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. तर केएल राहुल पाच आणि रिषभ पंत सहा व्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर तीन फिरकीपटू अष्टपैलू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन दिसणार आहेत. तर वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज ॲक्शन करताना दिसतील.
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद. सिराज
हेही वाचा-
पहिल्यांदा पाकिस्तानला लोळवले, आता भारताला दिला इशारा! बांगलादेश खेळाडूचे मोठे वक्तव्य
कृणाल पंड्याच्या घरी पूजेला दिसला नाही हार्दिक, नताशासोबत घटस्फोटानंतर भावांमध्ये वाढले मतभेद?
बेन स्टोक्सचे पुनरागमन, पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा