यंदाच्या टी20 विश्वचषकच्या अ गटातील भारत हा एकमेव संघ आहे, जो आतापर्यंत सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. भारतीय संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यासाठी मियामीला (फ्लोरिडा) पोहोचला आहे, जिथे 15 जून रोजी भारताचा कॅनडा विरुद्ध सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना फ्लोरिडाच्या लॉडरहिल भागात असलेल्या सेंट्रल ब्रोवार्ड पार्क स्टेडियमवर होणार आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कारण मुसळधार पावसामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे येथील रस्ते पाण्याने ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत, भारत विरुद्ध कॅनडा सामना पूर्ण होईल की रद्द होईल आणि जर सामना रद्द झाला तर त्याचा गट ‘अ’ च्या टेबलवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.
भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना लॉडरहिल येथे होणार असून ‘अ’ गटातील इतर 2 सामनेही या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. अमेरिकन वेळेनुसार शनिवारी भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार असून या दिवशी पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक आहे. लॉडरहिलमध्ये वादळ येण्याची 52 टक्के शक्यता आहे. फ्लोरिडा येथे सतत पाऊस पडत आहे आणि शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे. जर हवामानात सुधारणा झाली नाही तर भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील सामनी पावसामुळे रद्द करण्यात आला तर दोन्ही संघास 1-1 गूण वाटून दिले जातील. टीम इंडिया 7 गूणांसह अव्वल स्थानी राहील, तर दूसरीकडे कॅनडा संघ 3 गूणांवर पोहचेल. ज्याचा अन्य कोणत्याही संघास फरक पडणार नाही. कारण पाकिस्तान आणि अमेरिका 4 गूणांसह गुणतालिकेत पूढे आहेत. आज (14जून) होणाऱ्या अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना महत्वाचा ठरणार आहे. अमेरिका हा सामना जिंकल्यास किंवा पावसामुळे रद्द झाल्यास यजमान संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील.
महत्तवाच्या बातम्या-
अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!
टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे, विराटच्या नावी लज्जास्पद विक्रमाची नोंद!
अशी आहेत पाकिस्तानसाठी ‘क्वालिफाय’ समीकरणे, पाहा कोणत्या संघाचा होणार पत्ता कट





