असे म्हटले जाते की, जगात एकसारखी चेहरापट्टी असलेले जवळपास ७ व्यक्ती व्यक्ती असतात. याची बरीचशी उदाहरणे आपण वास्तवातही पाहिली आहेत. क्रिकेट क्षेत्राविषयीच बोलायचे झाले तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरपासून ते आताच्या विराट कोहलीपर्यंत, बऱ्याचशा क्रिकेटपटूंसारखे दिसणारे व्यक्ती पुढे आले आहेत. नुकताच नॉटिंघम येथे चालू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानही असाच एक चेहरा चर्चेत आला आहे. हा व्यक्ती हुबेहूब भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्यासारखा दिसतो आहे.
भारत-इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंतने छोटेखानी पण झंझावती खेळी केली. इतरांबरोबर स्टेडियममध्ये बसलेला एक व्यक्तीही त्याच्या या धुव्वादार फटकेबाजीचा आनंद लुटत होता. कॅमेरामनने त्याच्याकडे कॅमेरा वळवला आणि सर्वांच्या नजरा त्या व्यक्तीवर खिळल्या. कारण तो व्यक्ती अगदी मैदानावर फलंदाजी करत असलेल्या पंतसारखा दिसत होता. त्याची चेहरापट्टी, हेयरस्टाइल, हसण्याची पद्धत सर्वकाही पंतशी मिळतेजुळते आहे. मात्र अद्याप त्याचे नाव पुढे आलेले नाही.
पंतसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Rishabh Pant doppleganger?#ENGvIND | #INDvENG | @RishabhPant17 pic.twitter.com/oqVZXD1Yxl
— Sridhar_FlashCric (@SridharBhamidi) August 6, 2021
दरम्यान पंत पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा (३६ धावा) बाद झाल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांना दुहेरी धावसंख्याही न करू देता पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेही दुर्दैवीरित्या धावबाद झाला होता.
अशात सहाव्या क्रमांकावर फंलदाजीला आलेल्या पंतकडून सर्वांनी बचावात्मक फलंदाजीची अपेक्षा केली होती. पण त्याने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. मात्र त्याच्या या फटकेबाजीवर लवकरच अंकुश लागला. तो ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर जॉनी बेयरस्टोच्या हाती झेल देत २५ धावांवर बाद झाला होता.
पुढे तिसऱ्या दिवशी केएल राहुल (८४ धावा) आणि रविंद्र जडेजाच्या (५६ धावा) खेळीमुळे भारताने २७८ धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेतली. या धावांचा पाठलाग करण्याताना रॉरी बर्न्स आणि डोमिनिक सिब्ली मैदानावर आहेत. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर बिनबाद २५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पिछाडीवर असलेल्या SRHला मिळणार बळ! ‘यॉर्कर किंग’ नटराजन पुनरागमनासाठी गाळतोय घाम
पत्रकाराच्या लांबलचक प्रश्नावर वैतागलेल्या कोहलीचे तिखट उत्तर; नेटकरी म्हणाले, ‘घनघोर अपमान’
ऑस्ट्रेलियाचे पुन्हा लोटांगण, बांगलादेशने जिंकला सलग तिसरा टी२० सामना; रिकॉर्ड बुकमध्ये मिळवली जागा