---Advertisement---

ENG vs IND: लॉर्ड्सवर भारताचा लाजिरवाणा पराभव! इंग्लंडने 2-1 ने जिंकली वनडे मालिका

On: सोमवार, जुलै 20, 2026 7:24 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड IND VS ENG यांच्यातील तीन सामन्यांच्या ODI SERIES एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 3 बाद 387 धावांचा डोंगर उभारला. ज्यामध्ये बेन डकेटने शानदार शतक झळकावत 141 धावा केल्या. शिवाय, जेकब बेथेल 91 तर जो रूटने 74 धावांची नाबाद खेळी केली.

388 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत 7 बाद 360 धावा करता आल्या. परिणामी, इंग्लंडने हा सामना 27 धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशी खिशात घातली. ENGLAND WON ODI SERIES BY 2-1

भारताकडून रोहित शर्माने ROHIT SHARMA उत्कृष्ट शतक ठोकले. कर्णधार शुबमन गिलने 77 धावांचे योगदान दिले, तर विराट कोहलीने VIRAT KOHLI 74 धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये सॅम करनने सर्वाधिक 4 बळी घेतले.

प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी इंग्लंडला शानदार सुरुवात करून दिली. या जोडीने सलामीच्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. बेथेल 91 धावांवर बाद झाल्यामुळे त्याचे शतक हुकले. त्यानंतर, डकेटने जो रूटसोबत शतकी भागीदारी करत स्वतःचे शतक पूर्ण केले.

डकेटने 135 चेंडूत 141 धावा केल्या, ज्यामध्ये 18 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. जो रूट 48 चेंडूत 774 धावांवर नाबाद राहिला.

अंतिम षटकांमध्ये जोस बटलरने केवळ 13 चेंडूत 41 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक (2) बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---