भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथे पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर १५६ धावा उभारल्या. मात्र, भारतीय डावात यष्टीरक्षक रिषभ पंत अत्यंत दुर्देवीरित्या धावबाद झाला. पंत बाद होण्यात चूक कोणाची असा प्रश्न आता नेटकरी विचारू लागले आहेत.
धावबाद झाला पंत
भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर केएल राहुल, रोहित शर्मा व ईशान किशन हे तिघे धावफलकावर २४ धावा असताना बाद झाले. त्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत ही जोडी जमली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ४० धावा जोडल्या.
दुर्दैवीरित्या बाद झाला पंत
भारतीय डावाच्या बाराव्या षटकात सॅम करन गोलंदाजीसाठी आला. त्या षटकातील पहिला चेंडू पंतने ऑफ साईडच्या दिशेने तटवला. विराट व पंत यांनी दोन धावा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.
मात्र, क्षेत्ररक्षकाकडून आलेला थ्रो इंग्लंडचा यष्टिरक्षक जोस बटलर यशस्वीरीत्या अडवू शकला नाही. चेंडू मोकळ्या जागेत गेल्याने नॉन स्ट्राइकवर असलेल्या विराटने तिसऱ्या धावेसाठी पंतला हाक दिली. आधीच बराच पुढे गेलेला पंत अचानक मागे वळला आणि विराटच्या हाकेला प्रतिसाद देत तिसऱ्या धावेसाठी धावला. इतक्यात बटलरने चेंडू उचलून सॅम करनकडे फेकला व त्याने पंतला धावबाद केले. पंतने २० चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा केल्या.
https://twitter.com/PrabhasFansoff/status/1371835865735987202
https://twitter.com/Pran33Th__18/status/1371832810185617417
नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न
रिषभ पंत अशाप्रकारे बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. पंत बाद होण्यात चूक कोणाची? असा प्रश्न आहे एका ट्विटर वापरकर्त्याने विचारला. एका चाहत्याने विराटला जबाबदार धरत म्हटले, ‘विराटला आपल्या साथीदाराच्या मर्यादा समजायला हव्यात’
Rishabh pant's run out was the turning point.virat needs to understand his partner's limitations as well while running the runs.#INDvENG
— Saksham (@Sakd0323) March 16, 2021
अन्य एका वापरकर्त्याने या धावबादसाठी विराटला जबाबदार धरले. त्याने एक मीम शेअर करत लिहिले, ‘विराटने धावबाद केल्यानंतर पंतची प्रतिक्रिया’
Rishabh Pant after getting run out by Virat Kohli#INDvENG #Ahmedabad #NarendraModiStadium pic.twitter.com/1kd87JGXpu
— Sahil Munjal (@theoctoberman_) March 16, 2021
अनेकांनी पंतचा धावबाद हा सामन्यातील टर्निंग पाँइंट होता.
Fantastic innings by Jos Buttler 👏👏👏
India – Virat
Eng – Buttler 💥Only difference is PANT run out 😏
— 🔥Superstar🔥 (@SraoneTweets) March 16, 2021
https://twitter.com/nmonbird/status/1371876551810113540
England played well today ,deserved to win ,had pant not been run out match could have got interesting
— alok patil (@alok_p17) March 16, 2021
Pant run out turning point today
— M@llik@rjun (@veerutherocker) March 16, 2021
इंग्लंडचा दमदार विजय
मालिका १-१ अशा बरोबरीत असताना तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला सहजरीत्या पराभूत केले. भारताने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने नाबाद ८३ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. जॉनी बेअरस्टोने नाबाद ४० धावा बनविल्या. उभय संघामधील चौथा सामना १८ मार्च रोजी खेळविला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचा अप्रतिम झेल आणि प्रशिक्षकांची शिट्टी, पाहा खास व्हिडिओ
बटलरने चुकवला थ्रो आणि कोहलीने चोरली धाव, पाहा व्हिडिओ
‘कर्णधार’ कोहली अव्वल स्थानी! अर्धशतकासह केन विलियम्सनच्या ‘या’ विश्वविक्रमाची बरोबरी