India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून 1-1 ने बरोबरी झाली आहे. त्यामुळे पुढील तीन सामने निर्णायक ठरणार आहेत. त्यात भारताने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. याबरोबरच भारतीय संघासमोर विराट कोहलीच्या गैरहजेरीमध्ये उर्वरित तीन कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करत विजय मिळवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे.
याबरोबरच, भारतीय संघाचा कसोटी सामना हा राजकोटच्या मैदानावर किमान पाच वर्षानंतर होत आहे. तर या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 2016 मध्ये सामना झाला होता. तसेच राजकोटच्या मैदानावर आतापर्यंत फक्त दोनच कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता, तर इंग्लंडविरूद्ध झालेला सामना हा बरोबरीत सुटला होता.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 537 धावा केल्या होत्या. यामध्ये जो रुट आणि बेन स्टोक्स यांनी शतकी खेळी केली होती. तर भारताने पहिल्या डावात 488 धावा केल्या होत्या. तसेच भारताकडून मुरली विजय याने 126 तर चेतेश्वर पुजाराने घरच्या मैदानावर 124 धावांची खेळी केली होती. तर इंग्लंडने दुसरा डाव हा 260 धावांवर घोषित केला होता. तसेच पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावा केल्या होत्या. त्यामुळे राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेला हा सामना बरोबरीत सुटला होता.
दरम्यान, राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 2018 मध्ये कसोटी सामना झाला होता. तर हा सामना भारताने 272 धावांनी जिंकला होता. तसेच भारतीय संघाने 9 विकेटच्या मोबदल्यात 649 धावांचा डोंगर उभा केला होता.
घ्या जाणून इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ :-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
महत्वाच्या बातम्या –
- पंचांच्या निर्णयाने ऑस्ट्रेलियन संघ हैराण! पाहा फलंदाज धावबाद असून का नाही दिले आऊट?
- U19 World Cup Final : भारताचे तीन महिन्यांत दोनदा विश्वचषकाचे स्वप्न भंगले; कोहली-रोहितनंतर उदय-सचिनलाही अपयश…