ऑस्ट्रेलियन संघ सध्या मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहेत. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (11 फेब्रुवारी) एडिलेटमध्ये खेळला गेला. ग्लेन मॅक्सवेल याने या सामन्यात वादळी खेळी करत कारकिर्दीतील पाटवे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. मॅक्सवेलच्या झंजावातामुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभी केली आणि मालिकेतील सलग दुसरा विजय देखील मिळवला. असे असले तरी, या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला आश्चर्य वाटले.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या नुकसानावर 241 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघाने 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 207 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण रविवारी (11 फेब्रुवारी) मैदानात असे काही झाले, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ आणि त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लाईव्ह सामन्यात पंचांच्या एका निर्णयाने सर्वांचाच गोंधळ उडाला. पण यात चूक पंचांनी नसून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची होती.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला एक हातची विकेट मिळाली नाही. वेस्ट इंडीज संघ 242 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजी करत होता. वेस्ट इंडीजच्या डावातील 19व्या षटकात अल्जारी जोसेफ धावबाद झाला. पण पंचांनी त्याला बाद दिले नाही. कारण ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून विकेटसाठी अपील केली गेली नव्हती. पंचांच्या हा निर्णय ऑस्ट्रेलियन संघासाठी धक्कादायक होता. पण क्रिकेटच्या नियमानुसार जोपर्यंत विकेटसाठी अपील केली जात नाही, तोपर्यंत पंच एखाद्या खेळाडूला बाद देत नाहीत. एससीसी क्रिकेट नियम 31.1 नुसार पंचांनी रविवारी हा निर्णय दिला. पण एखादा फलंदाज स्वतःहून बाद असल्याचे मान्य करतो आणि खेळपट्टी सोडतो, तेव्हा पंच देखील या खेळाडूला बाद देतात.
An interesting trivia related to recent incident.
In IPL 2014, Kevin Pietersen was saved from a clear run-out in BOTH home and away matches against Rajasthan Royals. But wasn’t out on both occasions, because RR did not appeal/appealed weakly.pic.twitter.com/gayg60l3oa
— Kausthub Gudipati (@kaustats) February 12, 2024
दरम्यान उभय संघांतील पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियानेच 11 धावांनी विजय मिळवला होता. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (13 फेब्रुवारी) पर्थवर खेळला जाणार आहे. (The West Indies player was given a life as the Australians did not appeal)
महत्वाच्या बातम्या –
केन विलियम्सनवर कोसळला दुःखाचा डोंगर! ‘फॅमिली मेंबर’ काळाच्या पडद्याआड
IND vs ENG Rajkot 3rd Test Playing 11: तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा-केएल राहुल बाहेर बसणार का? अशी असणार प्लेइंग 11