क्रिकेटटॉप बातम्या

आधी कसोटी, आता वनडे क्रिकेटमधूनही होणार बाबर आझमची सुट्टी?

पाकिस्तान क्रिकेट संघाचा रन मशिन म्हणून ओळखला जाणारा स्टार फलंदाज बाबर आझमचे (Babar Azam) वनडे क्रिकेटमधील स्थान धोक्यात आले आहे. एकीकडे त्याला लागोपाठच्या पराभवानंतर कर्णधारपदाची जबाबदारी सोडावी लागली, तर आता त्याचे संघातील उरलेलेही स्थान धोक्यात आले आहे. बाबर कसोटीत सतत फ्लॉप ठरल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे, त्यामुळे आता त्याला वनडेतूनही वगळले जाऊ शकते.

बाबर आझमसाठी (Babar Azam) कसोटीत धोका बनलेल्या कामरान गुलामने (Kamran Ghulam) आता वनडेतही बाबरसाठी धोका निर्माण केला आहे. कसोटीत जबरदस्त शतकाने सुरूवात केल्यानंतर कामरानने आता वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. त्याच्यामुळे बाबरचा वनडे फॉरमॅटमध्ये पत्ता कटू शकतो.

झिम्बाब्वेविरूद्ध खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कामरान गुलामने (Kamran Ghulam) जबरदस्त शतक झळकावले आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या या 29 वर्षीय स्टार फलंदाजाने 10 चौकारांसह 4 षटकारांच्या मदतीने 103 धावांची धमाकेदार खेळी केली. कामरानने आपल्या 7व्या एकदिवसीय सामन्यात हे शतक झळकावले आहे.

गेल्या वर्षी जानेवारीत वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कामरान गुलामने (Kamran Ghulam) आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून केली होती. या खेळाडूला इंग्लंडविरूद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत बाबर आझमला संघातून वगळून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली, जिथे त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून खळबळ उडवून दिली होती.

बाबर आझमच्या (Babar Azam) आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने पाकिस्तानसाठी 2015 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने पाकिस्तानसाठी 120 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 119 डावात फलंदाजी करताना 56.95च्या सरासरीने फलंदाजी करताना 5,809 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 88.70 राहिला आहे. वनडेमध्ये त्याने 32 अर्धशतकांसह 19 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 158 राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी; भारताच्या स्टार गोलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा…!!!
IPL 2025; आयपीएल 2025 मधील सर्व संघाचे संभाव्य कर्णधार!
पंजाब किंग्जच्या ‘या’ गोलंदाजाने गाजवले मैदान, घेतल्या 7 विकेट्स

Related Articles