---Advertisement---

दिग्गजांनी टीम इंडियाला सुनावले खडे बोल

On: मंगळवार, ऑगस्ट 14, 2018 7:00 AM
---Advertisement---

लंडन। 9 ते 12 आॅगस्ट दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला एक डाव आणि 159 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली आहे.

भारताच्या या पराभवामुळे अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतीय संघावर कडक शब्दात टीका केली आहे. यामध्ये विरेंद्र सेहवाग, बिशनसिंग बेदी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.

या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती. भारताला पहिल्या डावात 107 तर दुसऱ्या डावात 130 धावाच करता आल्या.

एजबस्टन येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही भारतीय फलंदाजी अपयशी ठरली होती. त्यामुळेही टीका होत आहे.

भारताच्या या पराभवानंतर सेहवागने म्हटले आहे की, “भारताची वाईट कामगिरी झाली. आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा होता पण त्याचवेळी त्यांची चांगली कामगिरी झाली नाही. संघर्ष न करताच पराभव स्विकारल्याचे पाहणे निराशाजनक होते. आशा आहे त्यांना यातून पुनरागमन करण्यासाठी मानसिक ताकद आणि आत्मविश्वास असेल.”

तर लक्ष्मणने म्हटले आहे की, “न आवडणाऱ्या परिस्थितीमध्ये आडकलो आहे. लढत न देता भारत लॉर्ड्स कसोटी हारला. आशा आहे की यातून ते लवकर शिकतील. फलंदाजही पुढे चांगले खेळतील. ”

भारताचे माजी गोलंदाज बिशनसिंग बेदींनीही भारताच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेत मोहम्मद कैफ आणि विनोद कांबळी या माजी क्रिकेटपटूंनीही भारताच्या पराभवाबद्दल  ट्विट कले आहे.

भारताचा इंग्लंड विरुद्ध तिसरा कसोटी सामना 18 आॅगस्ट पासून नॉटिंगहॅम येथे सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा

तब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम

कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment