---Advertisement---

‘बाबांनो आता तरी फिटनेसवर लक्ष द्या’, इंग्लंडला धावांचा डोंगर उभारु देणाऱ्या भारतीय गोलंदाजांना माजी खेळाडूचा मोलाचा सल्ला

On: गुरूवार, फेब्रुवारी 11, 2021 4:05 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिला सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या डावात विजयासाठी ४२० धावांचा पल्ला भारतीय फलंदाजांना गाठता आला नाही. यामुळे भारतीय संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. चेन्नईची खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असूनही पहिल्या डावात भारताचे तीन फिरकी गोलंदाज इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखू शकले नाहीत. याचमुळे भारतीय संघाच्या फिरकीपटूंना भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विशेष सल्ला दिला आहे.

संजय मांजरेकर यांच्या मते, ‘चेन्नईचा खेळपट्टीवर अगदी सुरुवातीपासून चेंडूला वळण मिळत होते. असे असले तरीही भारतीय गोलंदाज इंग्लंडला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखू शकले नाहीत. नाणेफेक जिंकल्यामुळे इंग्लंड हा सामना जिंकला असे म्हणणे चुकीचे आहे. कारण जो रूटने या सामन्यात उत्तम फलंदाजी केली होती.’

मांजरेकर यांनी भारतीय संघाच्या फिरकीपटूंना आपल्या तंदुरुस्तीवर काम करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात की, “चेन्नईच्या खेळपट्टीवर चेंडूला हळूहळू फिरकी मिळते आणि अशा परिस्थितीत आपल्याला अशा गोलंदाजांची गरज होती जे वेगाने हवेत चेंडू फेकू शकतात.”

महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

अश्विन, कुलदीप आणि नदीम यांना त्यांच्या तंदुरुस्तीवर लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगताना त्यांनी एक मोलाचा संदेश दिला. त्यांच्या मते, “या खेळाडूंनी आपल्या शरीराकडे आणि बोटाकडे पूर्णपणे लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही पूर्ण फिट नसाल तर तुम्ही आपल्या शरीराचा वापर करता. यामुळे तुमच्या गोलंदाजीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जडेजा एक सर्वोत्तम गोलंदाज आहे, कारण त्याने आपल्या गोलंदाजीवर खूप काम केले आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या विश्वविजयावर आधारित ‘८३’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली, ‘या’ दिवशी होणार रिलीज

गंभीर आजारने ग्रस्त, मृत्यूशी दिली झुंज, आता गाजवतोय क्रिकेटचं मैदान; वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास

Video: ‘लाज नाही वाटत का, काय गाणं बनवलंय; माझी पोरं बोलायची बंद झालीत’, PSLचे गाणे पाहून भडकला शोएब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---