अखेरच्या टी20 सामन्यामध्ये भारताने इंग्लंडला 36 धावांनी पराभूत करून पाच सामन्यांची टी20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. हा भारताचा सलग सहावा आंतरराष्ट्रीय टी२० मालिका विजय आहे. भारतीय संघाच्या या विजयात खास ‘मुंबई कनेक्शन’ दिसून आले आहे.
या मालिकेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. जर आपण शेवटच्या टी20 विषयी चर्चा केली तर चार फलंदाज भारताकडून फलंदाजीकरीता आले. कर्णधार विराट कोहली वगळता रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे तिघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारे होते. विषेश म्हणजे रोहित आणि सुर्यकुमार हे देशांतर्गत क्रिकेटही मुंबईकडून खेळतात.
तिघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी विराटसमवेत मालिकेतील सर्वाधिक 94 धावांची भागीदारी केली. त्याने 34 चेंडूत 188 च्या स्ट्राइक रेटने 64 धावा केल्या. रोहितप्रमाणेच सूर्यकुमार यादव देखील या सामन्यात चमकला आणि त्यानेहीे अवघ्या 17 चेंडूत 188 च्या स्ट्राइक रेटने 32 धावा फटकावल्या. यावेळी हार्दिक पांड्यानेहीे आपले अचूक काम केले आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या पांड्याने 229 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 17 चेंडूत 39 धावा केल्या. या तिन्ही खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर भारताने टी20 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 224 धावा केल्या.
मुंबईच्या खेळाडूंनी भारताच्या मालिका विजयात दाखवली चमक
इंग्लंडविरुद्धच्या केवळ अखेरच्याच टी20 सामन्यात मुंबईचे खेळाडू चमकले असे नाही, या मालिकेत जेव्हा जेव्हा संघाला आवश्यकता होती, तेव्हा मुंबईचे खेळाडू पुढे आले. चौथ्या टी२० सामन्यात भारताने 8 धावांनी मिळवलेला रोमांचक विजय मिळवला. त्या सामन्यात कोहलीने दुखापती टाळण्यासाठी मैदानातून अखेरच्या 4 षटकांसाठी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोहितने सामन्याच्या अखेरच्या 4 षटकांत भारताचे कर्णधारपद सांभाळले.
त्यावेळी इंग्लंडला 24 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे 6 विकेटही बाकी होत्या. पण रोहितने आपल्या कुशल रणनीतीच्या जोरावर सामन्याची स्थिती पालटली आणि इंग्लंडला विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. रोहितने फलंदाज म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. त्याने मालिकेच्या तीन सामन्यात 144 च्या स्ट्राइक रेटने 91 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
युसुफ, युवराजने मिळून केली तब्बल ९ षटकारांची बरसात, चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
INDvENG: पाचव्या टी२० सामन्यात टी नटराजनला का मिळाली केएल राहुल ऐवजी संधी, विराट कोहलीने केला खुलासा
आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ