---Advertisement---

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला ‘तेंडुलकर-कूक ट्रॉफी’ नाव द्या, पाहा कुणी केलीय ही मागणी

---Advertisement---

सध्या भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध मायदेशात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अनेक देशात ज्या द्विपक्षीय मालिका होतात, त्यांना त्या दोन देशातील महान खेळाडूंची नावं दिली जातात. तसेच नाव भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला देण्याची मागणी इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनी केली आहे.

इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेला खास नाव देण्याची मागणी केली आहे. त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर व इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकचे नाव या ट्रॉफीला देण्याची मागणी केली आहे. या ट्रॉफीला तेंडूलकर-कूक ट्रॉफी असे नाव द्यावे, असे ट्विट पानेसरने केले आहे.

“भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सचिन-कूक ट्रॉफी असे संबोधले पाहिजे. कारण सचिन व कूकने आपआपल्या देशांकडून कसोटीत सर्वोच्च धावा केल्या आहेत. तसेच हे दोन खेळाडू एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर क्रिकेट देखील खेळले आहेत. आपल्या माहित आहे की सचिन एक महान खेळाडू आहे व त्याच्या नावाने कोणतीही मालिका होत नाही,” असे पानेसरने ट्विटमध्ये म्हटले.

यावर एका फॅनने लिहीले आहे की, ‘या ट्रॉफीचे नाव भज्जी-पानेसर ट्रॉफी करायला हवे.’ यावर पानेसर म्हणतोय, ‘जर मी 300 पेक्षा जास्त कसोटी बळी घेतले असते तर हे घडले असते.’

यावर प्रसिद्ध क्रिकेट सांख्यिकी तज्ञ मोहनदास मेनन म्हणतात, ‘सध्या या मालिकेचे नाव एंथनी डी मेलोच्या नावावर आहे. (भारतात खेळली जाते तेव्हा ) ज्याची सुरुवात 1951 मध्ये झाली होती. जेव्हा ही मालिका इंग्लंडमध्ये होते तेव्हा तीला पतौडी ट्रॉफी म्हटले जाते.(2007 पासून नवाब पटौडी यांचे नाव दिले जाते. )’

द्विपक्षीय कसोटी मालिकांची नावं- 
कसोटी क्रिकेटमध्ये अनेक द्विपक्षीय मालिकांना नावं देण्यात आली आहेत. त्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हटले जाते. वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला फ्रॅंक वॉरेल ट्रॉफी, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेला विस्डेज ट्रॉफी, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका जर भारतात होत असेल तर एंथनी डी मेलो व इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका इंग्लंडमध्ये होत असेल तर पतौडी ट्रॉफी असे म्हटले जाते. तसेच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ऍशेस म्हटले जाते.

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेला ट्रान्स-टास्मान ट्रॉफी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिंबाब्वेमध्ये होणाऱ्या द्वपक्षीय मालिकेला साऊदन क्रॉस ट्रॉफी तर वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेला सर व्हीव्हीयन रिचर्ड्स ट्रॉफी म्हटले जाते. वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका मालिकेला सोबर्स-थिसेरा ट्रॉफी असे संबोधले जाते.

वेस्ट इंडिज विरुद्ध झिंबाब्वे मालिकेला वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव लॉयड यांचे नाव दिले आहे. तसेच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या कसोटी मालिकेला बासील डी’ओलीव्हेरा ट्रॉफी, श्रीलंका इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेला वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफी म्हटले जाते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका देशांत होणाऱ्या कसोटी मालिकेला गांधी-मंडेला सिरीज म्हटले जाते तर ट्रॉफीला फ्रिडम ट्रॉफी म्हटले जाते. 

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेला गांगुली- दुर्जॉय ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. द्विपक्षीय मालिकांना नाव देण्यात वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सर्वात आघाडीवर आहे. त्यांनी अनेक द्विपक्षीय मालिकांना नावं दिली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश दरम्यान होणाऱ्या ट्रॉफींना नावं दिली आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध श्रीलंका, भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध अफगाणिस्तान, भारत विरुद्ध आयर्लंड व भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या मालिकांना अजून तरी कोणतेही नाव देण्यात आलेले नाही.

महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

महत्त्वाच्या बातम्या-

कोहलीला ड्रिम इलेव्हनचा कॅप्टन करा अन् रहाणेला टीम इंडियाचा विराटवर टीका करताना अजिंक्यला कर्णधार करण्याची होतेय मागणी

भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर झाले नाराज, तडकाफडकी दिला उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

‘गोरी तेरी आँखें कहें’, युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबतचा रोमँटिक लूक भन्नाट व्हायरल, पाहा फोटो

पराभवानंतर साडेसाती..! अष्टपैलू रविंद्र जडेजा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर? महत्वाची माहिती समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---