भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर मात करत सामना आणि मालिका खिशात घातली. या सामन्यात भारताकडून गोलंदाजी आणि फलंदाजी अशी दोन्ही विभागात अनेक खेळाडूंनी विशेष कामगिरी केली. हा संपूर्ण सामना आता हाईलाईट्सच्या स्वरूपात प्रेक्षकांसाठी उपललब्ध झाला आहे.
A special innings seals the series for India in Manchester 🏏
🏴 #ENGvIND 🇮🇳 @RL_Cricket pic.twitter.com/YxeipqCgWx
— England Cricket (@englandcricket) July 18, 2022
मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांना विजय अनिवार्य होता. या निर्णायक सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पंड्याने चार व युझवेंद्र चहलने तीन बळी मिळवत इंग्लंडला २५९ धावांवर रोखले. इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलरने एकमेव अर्धशतक ठोकले.
प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे तीनही फलंदाज केवळ ३८ धावांवर बाद झाले. सूर्यकुमार यादवही चौथ्या गड्यांच्या रुपात तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पंड्या व यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी शतकी भागीदारी केली. हार्दिकने अर्धशतक ठोकले. रिषभने नाबाद शतक ठोकत भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून दिला. तोच सामन्याचा मानकरी ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताशी दोन हात करण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ सज्ज, वाचा कोणाकोणाला मिळाली संधी?
‘याच’ ४ खेळाडूंच्या जोरावर भारताने विश्वविजेत्यांना त्यांच्या धर्तीवर लोळवलंय