Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘याच’ ४ खेळाडूंच्या जोरावर भारताने विश्वविजेत्यांना त्यांच्या धर्तीवर लोळवलंय

'याच' ४ खेळाडूंच्या जोरावर भारताने विश्वविजेत्यांना त्यांच्या धर्तीवर लोळवलंय

July 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
indveng

Photo Courtesy: Twitter/BCCI


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडचा पराभव केला. भारताने रविवारी मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून विजय नोंदवला. याआधी टीम इंडियाने टी-२० मालिकाही २-१ ने जिंकली होती. भारतीय संघाने मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात (ENG vs IND 3rd ODI) इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ ४५.५ षटकांत केवळ २५९ धावाच करू शकला. भारतीय संघाने ४२.१ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. यापूर्वी त्याने टी-२० मालिकाही २-१ अशी जिंकली होती.

यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. तो ११३ चेंडूत १२५ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत १६ चौकार आणि २ षटकार मारले. रिषभ पंतने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने क्रेग ओव्हरटनच्या डावातील ४१व्या षटकातील ५व्या चेंडूवर एकच धाव घेतली आणि १०० धावांची वैयक्तिक धावसंख्या गाठली. पंतने २७व्या वनडेत पहिले शतक झळकावले. यासाठी त्याने १०६ चेंडू खेळले. पंतने जो रुटच्या डावातील ४३व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आज अपेक्षेप्रमाणे खेळला. भारताच्या ४ विकेट ७२ धावांवर पडल्या. यानंतर पंत आणि हार्दिकने फलंदाजी करत संघाला २०० च्या पुढे नेले. दोघांनी मिळून ५व्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानेही अप्रतिम कामगिरी केली. चेंडूने जोरदार खेळ दाखविल्यानंतर त्याने बॅटनेही फटकेबाजी केली. हार्दिकने अवघ्या २४ धावांत ४ बळी घेतले. त्यानंतर क्रमांक-६ वर फलंदाजी करताना ७१ धावा जोडल्या. तत्पूर्वी, हार्दिक पांड्यानेही इंग्लंडचा डाव २५९ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने सलामीवीर जेसन रॉय (४१), अष्टपैलू बेन स्टोक्स (२७), कर्णधार जोस बटलर (६०) आणि लियान लिव्हिंगस्टोन (२७) या इंग्लंडच्या स्टार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच ४ विकेट घेतल्या.

लेगस्पिनर युझवेंद्र चहलनेही चमकदार कामगिरी केली. त्याने ३ बळी घेतले. तथापि, ते थोडे महाग असल्याचे सिद्ध झाले. त्याने ६.१च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. चहलने डेव्हिड विली, क्रेग ओव्हरटन आणि रीस टोपलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले, ज्यामुळे यजमानांना थोडे दडपण आले. सिराजने जॉनी बेअरस्टो आणि जो रुटला ४ चेंडूतच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने डावाच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेअरस्टो (०) आणि शेवटच्या चेंडूवर जो रूटला (०) बाद केले. त्यामुळे इंग्लंडची धावसंख्या २ बाद १२ अशी झाली. इंग्लिश संघाला ४५.५ षटकांत केवळ २५९ धावा करता आल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

HAPPY BIRHDAY। धवन-पंतच्या प्रशिक्षकांनी सांगितलेलं ‘हा पुढे जाऊन धोनीची जागा चालवणार…’

धोनीला पिछाडत रोहित बनतोय भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार?, पाहा नवा विक्रम

धोनीबाबत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे मोठे विधान! म्हणाला, ‘सामना जिंकण्यासाठी माझ्यावर विश्वास…’


Next Post
Photo Courtesy: Twitter/@ICC

जेव्हा 'द वॉल'ची बॅट घेऊन स्मृती उतरली होती मैदानात, झळकावले होते झंझावती द्विशतक

Yuzvendra-Chahal-Rohit-Sharma

'तो भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा खेळाडू', वाचा रोहितने सामना जिंकल्यानंतर का गायले चहलचे गोडवे?

Hardik-Pandya-and-Rohit-Sharma

इंग्लंडमध्ये मालिकावीर ठरलेल्या पंड्याला 'हार्दिक' शुभेच्छा, पाकिस्तानच्या 'या' दिग्गजाला पछाडत रचलाय विक्रम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143