भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या नेतृत्व कौशल्यासाठी जगभर ओळखला जातो. तो असा आहे की ज्याने क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलली आहे. त्याने अनेक युवा खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीमध्ये योग्य मार्गदर्शन केले आहे. त्याने मैदानावर नव्या खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे.तो अगदी लहान वयातच कर्णधार झाला आणि तो निर्णय केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी बदलणारा ठरला. इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलमध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक देशी-परदेशी खेळाडूंनी त्यांची उत्तम कामगिरी केली आहे. त्यातील एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी.
द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) याने त्याच्या कारकिर्दीतील एमएस धोनी (MS Dhoni) याची भुमिका स्पष्ट केली आहे. तो धोनीच्या नेतृत्वाखालील असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग राहिला आहे. २०१८च्या हंगामात एनगिडीला ५० लाखांमध्ये संघात विकत घेतले होते. त्यानंतर त्याने ७ सामन्यात १४.१८च्या सरासरीने ११ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तेव्हा संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये खेळत होता. तसेच तो हंगाम चेन्नई संघाने जिंकले होता.
“धोनीसारखा खेळाडू तुम्हाला विश्वास दाखवत असताना सामने जिंकण्यासाठी प्रोत्साहित करतो हे माझ्यासाठी खूप महत्वाचे ठरले आहे. तेव्हा मी २२ वर्षांचा होतो,” असे महत्वपूर्ण विधान एनगिडिने त्याच्या मुलाखतीत केले आहे.
“मी कधीही ६० हजार प्रेक्षकांसमोर खेळलो नाही, मात्र लोकांनी खचाखच भरलेल्या मैदानात खेळण्याचा आत्मविश्वास मला आयपीएलमधून मिळाला आहे. त्यातच मोठ्या दबावाखाली खेळत उत्तम कामगिरी करण्याचे मी इथूनच शिकलो आहे. याचे सगळे श्रेय धोनीला जाते,” असेही एनगिडीने म्हटले आहे.
२०२०मध्ये कामगिरीच्या उच्च शिखरावर असताना एनगिडीला दक्षिण आफ्रिकेकडून वर्षाचा सर्वोत्तम टी२० आणि वनडे खेळाडूचा पुरस्कार मिळाला. त्याला २०२२च्या आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिट्ल्स संघाने घेतले असता त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक रचिला पाया| रिषभ झालासे कळस; वनडे मालिकेवर टीम इंडियाचा कब्जा
इंग्लंडविरूद्ध रिषभची पंतगिरी! ठोकले कारकिर्दीतील पहिले वनडे शतक
वेस्ट इंडिजची काही खैर नाही, भारताचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज नेटमध्ये गाळतोय घाम