---Advertisement---

ऍजबस्टन कसोटीत इंग्लंडने वापरलेली ‘बझबॉल’ रणनीती आहे तरी काय? कोच मॅक्यूलमशी कनेक्शन

On: मंगळवार, जुलै 5, 2022 11:21 PM
Brendon-McCullum
---Advertisement---

इंंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका मगंळवारी (५ जुलै) २-२ अशा बरोबरीवर निकाली लागली. मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंघमच्या ऍजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला, जो इंग्लंडने ७ विकेट्स राखून जिंकला. इंग्लंडने या सामन्यात ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, ते जबरदस्त होते. उभय संघातील हा कसोटी सामना सुरू असताना बझबॉल हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होता.

तसे पाहिले तर, बझबॉल (BazBall) हा शब्द नवीन नाहीये. परंतु ऍजबस्टन कसोटीच्या चौथ्या दिवसापासून हा शब्द सोशल मीडियावर खूपच ट्रेंड करत आहे. इंग्लंड संघ ही बझबॉल विचारधारा वापरून एजबस्टन कसोटीत खेळण्याचे सांगितले जात आहे. शेवटच्या डावात इंग्लंडला ३७८ धावांची आवश्यकता होती आणि संघाने ज्या आक्रमकतेसह हे लक्ष्य गाठले, ते पाहून या विचारधारेवर संघाचा विश्वास अधिकच वाढला असल्याचे सांगितले जात आहे. चला तर जाणून घेऊया हे बझबॉल नेमके आहे तरी काय?

इंग्लंडच्या कसोटी संघासाठी मागचे वर्ष एखाद्या भयानक स्वप्नाप्रामाणे होते. भारताविरुद्ध कसोटी मालिकेत १-२ अशा अंतराने मागे पडल्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऍशेस मालिकाही गमावली. सततच्या खराब प्रदर्शनानंतर इंग्लंड कसोटी संघात काही महत्वाचे बदल केले गेले. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ब्रँडन मॅक्युलम (Brandon McCullum) याला नियुक्त केले गेले. तसेच जो रुटऐवजी बेन स्टोक्सला नवीन कर्णधार बनवले गेले. बझबॉल विचारधारेचा जनक म्हणून ब्रँडन मॅक्युलमला ओळखले जाते.

बझ हे मॅक्युलमचे टोपण नाव आहे. त्यापासूनच पुढे बझबॉल असे नाव तयार झाले आहे. मॅक्युलमच्या मते कसोटी क्रिकेट खेळण्याची पद्धत आता बदलली पाहिजे. मॅक्युलमच्या त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विरोधी संघाला त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दबावात टाकले आहे. ही रनणीती नेहमीच त्याच्यासाठी फायद्याची ठरली आहे. आता इंग्लंड संघही याच बझबॉल रनणीतीचा उपयोग करून खेळत आहे. या रणनीतीसह इंग्लंडने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिला, तर भारताविरुद्धच्या मालिकेतील हा शेवटचा सामनाही जिंकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

विहारी भारताच्या पराभवास जबाबदार, सोडला बेयरस्टोचा महत्त्वाचा कॅच; नाहीतर निकाल असता वेगळा

विहारीने बेयरस्टोचा सोडलेला झेल ते गोलंदाजांचे अपयश; ऍजबस्टन कसोटीत’ ‘या ५ कारणांमुळे हरला भारत

पाचव्या कसोटीनंतर पहिल्या टी२० सामन्यालाही मुकणार रोहित शर्मा? समोर आली मोठी अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---