---Advertisement---

Asia Cup 2022 | पाकिस्तानविरुद्धचा मॅचविनर हार्दिक संघातून बाहेर, पंत करतोय पुनरागमन

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 7:49 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून आशिया चषक 2022 ची सुरुवात चांगली केली आहे. बुधवारी (31 ऑगस्ट) आशिया चषकात दुसरा सामना भारत आणि हॉंगकॉंग यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघासाठी हॉंगकॉंगचे आव्हान सोपे असल्यामुळे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्वाचा बदल पाहायला मिळाला. हार्दिक पंड्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करून रिषभ पंतला संघात घेतले गेले आहे. कर्णधार रोहितने याविषयी महत्वाची माहिती दिली. 

मागच्या सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. रिषभ पंतच्या ऐवजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसला होता. चाहत्यांना मागच्या सामन्यात पंतला पाहता आले नसले, तरी हॉंगकॉंगविरुद्ध पंत नक्कीच खेळणार आहे. हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळला होता. परंतु हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले आहे.

हॉंगकॉंगने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनविषयी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जेव्हा माहिती दिली, तेव्हा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यात खेळणार नसल्याचे समजले. हार्दिकविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “तो आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे आणि पुढच्या सामन्यात तो महत्वाची भूमिका पार पाडू शकतो.” रोहितच्या या वक्तव्यावरून समजते की, आगामी सामन्यापूर्वी हार्दिकला कसल्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवले गेले आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक),  दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा,आवेश खान, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

हाँगकाँग: निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी (यष्टीरक्षक), जिशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

“आता राशिद सर्वांना पार्टी देईल”; माजी कर्णधार अफगाणिस्तानच्या विजयाने आनंदला
हॉंगकॉंगच्या गोलंदाजाने स्विकारलेय विराटला बाद करण्याचे चॅलेंज; चार वर्षांपूर्वी रोहित-धोनीला दाखवलेला तंबूचा रस्ता
मास्टर ब्लास्टर सलग दुसऱ्यांचा भारताला बनवणार चॅम्पियन! करणार ‘या’ संघाचे नेतृत्व   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---