भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध लिसेस्टरशायर यांच्यात सराव सामना सुरू आहे. लिसेस्टर येथे सुरू असलेला सामना चार दिवस खेळला जाणार आहे. गुरूवारी (२३ जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारताचे काही खेळाडू लिसेस्टरशायरकडून खेळत आहेत. या सामन्यात एक भारतीय खेळाडू तर दोन्ही संघाकडून खेळत आहे. हे खरे असून या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ही आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली आहे.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने या सामन्यात दोन्ही संघाकडून फलंदाजी केली आहे. त्याने सर्वप्रथम लिसेस्टरशायरकडून फलंदाजी करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याला मोहम्मद शमीने शून्यावर बाद केले होते. भारताच्या दुसऱ्या डावात त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २२ धावा केल्या आहेत. त्याला आर साई किशोरने सॅम बॅट्सकरवी यष्टीचीत केले आहे.
या सामन्यात पुजारा, रिषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह यांचा सामन्याच्या सुरूवातीला लिसेस्टरशायरच्या अंतिम अकरामध्ये समावेश होता. साई किशोर, कमलेश नागरकोटी आणि नवदीप सैनी यांना नेटबॉलर म्हणून नेमले होते. तर हे तिघे पण या सामन्यात खेळले आहेत. गली क्रिकेटमध्ये एक फलंदाज दोन्ही संघासाठी फलंदाजी करतो. पुजाराने हे या सामन्यात केले ते पाहुन चाहते विचारात पडले आहेत.
???? ???????????? ???????????????????????? ???????????????????????????? ????
Bumrah bowling to Pujara and Kohli. ????
???????????????? ????????????????????????: https://t.co/SFmJYQNe8u ????
???????? 204/6, lead by 206
???? #IndiaTourMatch | #LEIvIND | #TeamIndia pic.twitter.com/3O7b2Vs1Pb
— Leicestershire CCC ???? (@leicsccc) June 25, 2022
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ८ विकेट्स गमावत २४६ धावांवर डाव घोषित केला होता. या डावात यष्टीरक्षक केएस भरतने नाबाद ७० धावा केल्या होत्या. त्याच्या बदल्यात लिसेसस्टरशायरने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भरतने सलामीला येत ४३ धावा केल्या. या डावात भारताच्या हनुमा विहारी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके केली आहेत. भारताने दुसऱ्या डावात ७ विकेट्स गमावत ३६४ धावा केल्या आहेत. जडेजा ५६ आणि मोहम्मद सिराज एक धाव करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत.
या सराव सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या जडेजाने तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याबरोबर शमी आणि कृष्णा यांनीही प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यानंतर भारतीय संघ १ ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध एजबस्टन, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहे. या महत्वाच्या सामन्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोविड पॉजिटिव्ह आढळला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयर्लंड विरुद्धच्या सामन्यांसाठी गावसकरांनी सुचविले ‘विकेटकिपर’चे नाव
आयर्लंड विरुद्ध भारत: पहिल्या टी२० सामन्यात पावसाचा व्यत्यय? वाचा हवामान आणि खेळपट्टी काय म्हणते ते
‘मी इथे कोणाला काही दाखवायला आलो नाही’, कर्णधार हार्दिक पंड्याचे टिकाकारांना कडवे प्रत्युत्तर






