भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेत विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकून धमाकेदार सुरुवात केली. आता उभय संघातील दुसरा सामना शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे पार पडणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला होता. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात आतापर्यंत 114 वनडे सामने खेळले गेले आहेत. उभय संघात आकडेवारीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली आहे. भारताने एकीकडे 56 सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 7 सामन्यांचा निकाल लागला नव्हता, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. सध्या भारतीय संघ विजयाच्या बाबतीत न्यूझीलंडपासून 6 सामने पुढे आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना कधी होईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना शनिवारी (दि. 21 जानेवारी) होईल.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना कुठे होईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे खेळला जाईल.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामनाभारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तसेच, सामन्याचा निकाल अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच 1 वाजता होईल.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा वनडे सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहायला मिळेल. या सामन्याचा आनंद कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय घ्यायचा असेल, तर डीडी फ्री डिशच्या डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर हा सामना पाहू शकता. (india vs new zealand 2nd odi when and where to watch match live read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या बोर्डालाच लावला चुना; आयसीसीची तब्बल ‘इतक्या’ कोटीची फसवणूक
“जास्तीत जास्त टी10 लीग खेळवा”, भारताच्या जगज्जेत्या खेळाडूंनी केली मागणी