भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने अत्यंत संघर्ष करत हा विजय मिळवला असला तरी, भारतीय संघातील खेळाडूंच्या खिशाला कात्री लागली आहे.
हैदराबाद येथील या सामन्यात भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा संथ गतीने षटके टाकली. भारतीय संघ निर्धारित वेळेपेक्षा तीन षटके मागे होता. मैदानी पंच नितीन मेनन, अनिल चौधरी तसेच तिसऱ्या व चौथ्या पंचांच्या शिफारसीनुसार, सामन्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी भारतीय संघाला याबाबतची कल्पना देत कारवाई आयसीसीच्य आचारसंहिता कलम 2.22 नुसार केली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने देखील ही चूक मान्य केली आहे. त्यामुळे रोहितच्या सामना शुल्कातून 60 टक्के तर इतर खेळाडूंच्या सामना शुल्कातून प्रत्येकी 20 टक्के रकमेची कपात केली जाईल.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास शुबमन गिल याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 350 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडने आपले सहा बळी केवळ 131 धावांवर गमावलेले. मात्र, त्यानंतर मायकेल ब्रेसवेलचे शतक व मिचेल सॅंटनरच्या अर्धशतकाने सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. तिथे भारतीय संघ 12 धावांनी विजयी झाला. द्विशतक झळकावणारा शुबमन सामनावीर ठरला.
मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (21 जानेवारी) रायपूर येथे खेळला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. मालिकेतील अखेरचा सामना इंदोर येथे होणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल.
(India have been fined 60% of their match fees for slow overrate against New Zealand in the first ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फॅशन शोमधील मॉडेल निवडा मग संघात…’, सरफराज खानच्या मुद्यावरून गावसकर संतापले
एमसीसीकडून ‘मांकडिंग’ नियमात बदल! एडम जम्पाच्या वादानंतर घेतला मोठा निर्णय