---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना कधी अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 7:00 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने भारतीय संघावर 2-1 ने विजय मिळवला. पण 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडला चांगलाच दणका दिला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 239 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 48 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. दरम्यान मालिकेतील दुसरा सामना केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा दुसरा टी20 सामना 22 जानेवारी, शुक्रवारी खेळवला जाईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा दुसरा टी20 सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक 6:30 वाजता होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा दुसरा टी20 सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स लाईव्हवर पाहू शकता.या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. अभिषेकने 35 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी केली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. शेवटी रिंकू सिंगने नाबाद 44 धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने 20 षटकांअखेर 7 गडी बाद 238 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 7 गडी बाद 190 धावांपर्यंत मजल मारता आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---