---Advertisement---

उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत-न्यूझीलंड संघातील दुसऱ्या कसोटीबद्दल सर्वकाही…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 8:00 PM
---Advertisement---

ख्राईस्टचर्च। उद्यापासून (29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India ) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना हेगले ओव्हल (Hagley Oval) येथे सुरु होणार आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये 25वा कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये खेळण्यात आलेल्या 24 सामन्यांपैकी 5 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला. तर 9 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला. त्याचबरोबर उर्वरित 10 सामने अनिर्णित राहिले.

तसेच सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 10 विकेट्सने विजय मिळवून 1-0 अशी आधीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला या मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक असेल. तर न्यूझीलंडचा संघ दुसरा सामना जिंकून भारताला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात फिरकीपटू आर अश्विनच्या (R Ashwin) जागी अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संधी दिली जाऊ शकते. तसेच दुखापतीमुळे इशांत शर्मा या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याच्याऐवजी उमेश यादवला संधी मिळू शकते. 

उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल सर्वकाही…

कधी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना?

– भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना शनिवारी (29 फेब्रुवारी) सुरु होणार आहे.

कुठे होणार आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना हेगले ओव्हल, ख्राईस्टचर्च येथे होणार आहे.

किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.00 वाजता सुरु होईल.

कोणत्या चॅनेलवर पाहता येणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना स्टार नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना हॉटस्टार या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येणार आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी यातून निवडले जातील 11 जणांचे संघ

न्यूझीलंड संघ- 

केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोलस, बीजे वॉटलिंग, कॉलिन डि ग्रँडहोम, टीम साऊथी, नील वॅगनर, ट्रेंट बोल्ट, एजाज पटेल, काईल जेमिसन, डेरेल मिशेल, मॅट हेन्री.

भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---