मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, या सामन्याच्या निकालावरुन मालिकेचा विजेता संघ ठरणार आहे.
मालिकेतील स्थिती
आयसीसी कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ स्पर्धेचा भाग असलेल्या या कसोटी मालिकेत सध्या पहिल्या सामन्यानंतर दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीवर आहेत. कानपूर येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यामुळे दुसरा कसोटी सामना मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
आमने-सामने
आत्तापर्यंत भारत आणि न्यूझीलंड संघात ६१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यातील २१ सामने भारताने जिंकले आहे, तर १३ सामने पराभूत झाले आहेत. तसेच २७ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याचबरोबर या ६१ सामन्यांपैकी ३५ सामने भारतात झाले आहेत. त्यातील १६ सामने भारताने जिंकले असून २ सामने हारले आहेत. १७ सामने अनिर्णित राहिले आहेत.
या दोन संघात मुंबईमध्ये अखेरचा सामना १९८८ साली झाला होता. तो सामना भारताने १३६ धावांनी गमावला होता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३ ते ७ डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्या. ९.०० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारताचा संघ: मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, श्रीकर भरत, प्रसिद्ध क्रिष्णा , सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड संघ: टॉम लॅथम, विल यंग, केन विलिम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, काईल जेमिसन, टिम साउथी, विल्यम सोमरविले, एजाज पटेल, मिशेल सँटनर, नील वॅगनर, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या कसोटीत पाऊस बिघडवणार भारत-न्यूझीलंडचा खेळ? पाहा कसे असेल मुंबईचे हवामान
कडक!! नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर फलंदाज क्लीन बोल्ड; ४ ते ५ फूट लांब उडला स्टंप