---Advertisement---

Video: “तुम्ही इथे या, मी अंपायरिंग करतो”; ‘त्या’ निर्णयानंतर सुटला विराटचा संयम

On: सोमवार, डिसेंबर 6, 2021 1:22 AM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजयासाठी न्यूझीलंडच्या फक्त पाच विकेट्सची आवश्यकता आहे. अशात सामना शेवटच्या दिवसापर्यंत खेळला जाईल, याची खूपच कमी शक्यता आहे. सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले. मात्र, कर्णधार विराट कोहली तरीही निराश दिसला. विराटच्या निराशेचे कारण संघातील खेळाडू नसून सामन्यातील पंच आहेत. पंचांनी या संपूर्ण सामन्यात खूपच खराब निर्णय दिले. अशात विराटचा एक व्हिडिओ सेशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराटने पंचांवर निशाणा साधल्याचे दिसतेय.

भारतीय संघ या सामन्यात पहिल्या डावापासून आघाडीवर आहे. शेवटच्या डावात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचे आव्हान ठेवले. न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १४० धावा केल्या आणि संघाने पाच विकेट्स गमावल्या आहेत. विराटने तिसऱ्या दिवशी मैदानावरील पंचांवर निशाणा साधला.

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर फलंदाजी करत होता आणि समोर अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. अक्षर पटेलच्या चेंडूवर टेलर त्रिफळाचित झाला असता. मात्र, तो वाचला आणि तो चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन चार धावा मिळाल्या. नियमांप्रमाणे पंचांनी या धावा बाय द्यायला हव्या होत्या. मात्र, त्यांनी या बॅटमधून आलेल्या धावा घोषित केल्या. पंचांच्या मते चेंडू टेलरच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेला आणि विराटच्या मते पंचांनी दिलेला हा निर्णय चुकीचा आहे. याच पार्श्वभूमीवर विराटने पंचांची फिरकी घेत म्हटले की, “तुम्ही माझ्या जागी या, मी तुमच्या जागी येतो.” विराटच्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड व्हायरल केले आहे.

दरम्यान, मुंबईत खेळल्या जात असलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात पंचानी खूपच निराशाजन निर्णय दिले आहेत. या सामन्यादरम्यान पंचांनी दिलेले निर्णय १५ वेळा चुकीचे ठरले आणि त्यांना ते बदलावे लागले. पंचांच्या या खराब प्रदर्शनाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---