भारताविरुद्ध (India vs New Zealand) 5 सामन्यांची टी20 मालिकेत (5 Matches of T20 Series) पराभूत झाल्यानंतर आता 3 सामन्यांच्या वनडे (3 Matches of ODI Series) मालिकेतील पहिले 2 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. या मालिकेतील तिसरा वनडे सामना मंगळवारी (11 फेब्रुवारी) बे ओव्हल (Bay Oval) येथे पार पडणार आहे.
सध्या न्यूझीलंडचा संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यासाठी न्यूझीलंड संघाने आपल्या संघात दोन महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यासाठी आपला फिरकीपटू गोलंदाज इश सोधी (Ish Sodhi) आणि फलंदाज ब्लेयर टिकनरला (Blair Tickner) पुन्हा संघात सामील करून घेतले आहे.
या दोन्ही खेळाडूंना क्राईस्टचर्चमध्ये सुरु असणाऱ्या भारत ‘अ’ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघाचा भाग होता येईल यासाठी वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्याआधी वरिष्ठ न्यूझीलंड संघातून मुक्त केले होते. परंतु वरिष्ठ न्यूझीलंड संघातील दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाने सोधी आणि टिकनर या खेळाडूंना पुन्हा बोलावले आहे.
न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज मिशेल सँटनर (Mitchell Santner) आणि टिम साऊथी (Tim Southee) यांना पोटाच्या दुखापतीचा त्रास होत आहे. तर वेगवान गोलंदाज स्कॉट कुगेलिजनला (Scott Kuggeleijn) ताप आहे.
त्यामुळे भारताविरुद्ध उद्या होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात या तिन्ही खेळाडूंच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे न्यूझीलंडने सोधी आणि टिकनर या खेळाडूंना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्टनुसार साऊथीची तब्येत ऑकलंड येथे खेळलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यावेळीही चांगली नव्हती. तरीही तो दुसऱ्या वनडे सामन्यात खेळला होता. तसेच त्याने कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) महत्त्वपूर्ण विकेटही घेतली होती.
याव्यतिरिक्त संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) खांद्याच्या दुखापतीमुळे सलग सामना खेळू शकत नाहीये. विलियम्सनला टी20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो शेवटचे 2 टी20 सामने तसेच वनडे मालिकेतील पहिले 2 सामने खेळू शकला नाही. परंतु, भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
…तर किंग कोहली भारताबाहेरही करणारा मोठा विक्रम
वाचा👉https://t.co/LLgd7eZK2k👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 10, 2020
शमी, जडेजाला कुंबळे, श्रीनाथ, कपिल देव यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याची संधी
वाचा👉https://t.co/C1dDu4iNwH👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @MdShami11 @imjadeja— Maha Sports (@Maha_Sports) February 10, 2020