भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने या मालिकेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. आता शेवटचा सामना जिंकून कीवी संघ आपला आत्मविश्वास उंचावूनच विश्वचषकासाठी रवाना व्हायचा प्रयत्न करेल.
भारतीय संघासाठी संजू सॅमसनचा (Sanju Samson) फॉर्म ही सध्या चिंतेची मोठी बाब आहे, त्यामुळे या सामन्यात सर्वांचे लक्ष त्याच्या कामगिरीवर असेल. टी-20 विश्वचषकापूर्वी स्वतःची लय सिद्ध करण्याची त्याच्याकडे ही शेवटची संधी आहे.
या मैदानाचा विचार करता, इथे गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते, त्यामुळे टॉस (नाणेफेक) अत्यंत महत्त्वाचा ठरेल. यापूर्वी या मैदानावर पावसाने व्यत्यय आणला होता, मात्र या सामन्यात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता फक्त 10 टक्के आहे. या शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल देखील पाहायला मिळू शकतात.






