साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियम, एजबॅस्टन येथे झाला. हा सामना राखीव दिवसापर्यंत म्हणजेच ६ व्या दिवसापर्यंत चालला. या सामन्यातील नियोजित ५ दिवसांपैकी २ दिवस पूर्णपणे पावसामुळे वाया गेले होते. त्यामुळे राखीव दिवशीही खेळ खेळवावा लागला.
अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पहिल्या दिवसापासूनच पावसाचे सावट होते. हा सामना शुक्रवारी (१८ जून) सुरु होणार होता. मात्र, या दिवशी पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नव्हती. त्यानंतर शनिवारी (१९ जून) हा सामना सुरू झाला. मात्र, नंतर कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने साधारण ६५ षटकांचाच खेळ झाला. तर रविवारीही (२० जून) याच कारणामुळे साधारण ७७ षटकांचाच खेळ होऊ शकला.
त्याचबरोबर सोमवारी म्हणजे सामन्याच्या चौथ्या दिवशीही पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. अखेरच्या दिवशी देखील सामना सुरु होण्यास पावसामुळे उशीर झाला. त्यामुळे हा सामना राखीव दिवशीही खेळवावा लागला.
गेल्या २ वर्षांत ३ सामन्यात पावसाची हजेरी
विशेष म्हणजे आयसीसी स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड सामना म्हणजे पावसाचा व्यत्यय हे समीकरण गेले २ वर्षांत पाहायला मिळाले आहे. गेल्या २ वर्षांत तीन वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आले आहेत. त्यातील तिन्ही सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे.
यापूर्वी इंग्लंडमध्येच पार पडलेल्या २०१९ विश्वचषकाच्या साखळी फेरीतील भारत आणि न्यूझीलंडचा सामना १३ जून रोजी पावसामुळेच नाणेफेकही न होता रद्द झाला होता.
याच विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यातही भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने होते. त्यावेळीही पावसाच्या व्यत्ययामुळे सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला होता. त्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती आणि अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. अंतिम सामन्यात त्यांना बाऊंड्री काऊंटच्या नियमामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
विशेष कट रचून न्यूझीलंडचा केला गेम, टीम इंडियाचा हुकमी एक्का शमीचा खुलासा
फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण मास्टर जडेजाचा कसोटी क्रमवारीत बोलबाला, पोहोचला अव्वलस्थानी
WTC Final, INDvNZ: आयसीसीने जाहीर केले राखीव दिवसाचे नवे नियम, जाणून घ्या सविस्तर