क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक आश्चर्यकारक रेकाॅर्ड्स झाले आहेत. पण याच यादीत धावबाद होण्याचाही रेकाॅर्ड आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा धावबाद झाल्याने संपूर्ण मैदानात खळबळ उडाली होती. हा रेकाॅर्ड 25 वर्षांपासून आजपर्यंत कायम आहे. एक नव्हे तर दोन्ही संघांचे इतके फलंदाज धावबाद झाले की गोलंदाज विकेटच्या शोधात होते.
1999 मध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात एकदिवसीय सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजापासूनच धावबाद सुरू झाले होते. राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी मिळून ब्रायन लाराला तंबूत पाठवले. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा फलंदाजही धावबाद झाला. हे फक्त इथेच थांबले नाही, तर 7, 8 आणि 9व्या क्रमांकावरील फलंदाजही धावबाद झाले.
या सामन्यात अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ यांसारखे दिग्गज खेळाडू विकेट्ससाठी तळमळत होते. कुंबळेला एकच विकेट मिळाली होती, तर ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 3 धावबाद विकेट्स घेतल्या होत्या. पण दुसऱ्या डावात रन आऊटची भीती एवढी होती की, भारतीय संघाचे फलंदाजही हादरले. भारताचे आणखी 3 फलंदाज धावबाद झाले. या यादीत अजय जडेजा, नयन मोंगिया, अनिल कुंबळे यांचा समावेश होता. या सामन्यात एकूण 8 धावबाद झाले. हा सामना एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा बाद होणारा सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-न्यूझीलंड सामन्यात अंपायरच्या निर्णयामुळे राडा!
भारतासाठी सर्वाधिक वनडे सामने जिंकणारे टॉप-5 कर्णधार
बाबर आझमच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर दिग्गज खूश, म्हणाला…