---Advertisement---

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेली ‘ती’ चूक न्यूझीलंड संघाला ठरली सर्वाधिक फायदेशीर

---Advertisement---

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी) हेमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात  पहिला वनडे सामना (ODI) पार पडला. या सामन्यात भारताला 4 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला.

भारताविरुद्ध टी20 मालिकेत ‘व्हाईटवॉश’चा सामना करणार्‍या न्यूझीलंड संघाला मात्र पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या दिशाहीन गोलंदाजीचा फायदा झाला. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 29 अतिरिक्त धावा दिल्या. त्यामध्ये 24 धावा वाईड बॉलमुळे मिळाल्या.

वनडे क्रमवारीमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात सर्वाधिक 9 वाईड बॉल टाकले आहेत. त्याचबरोबर, मोहम्मद शमीने 6 वाईड बॉल टाकले आहेत. या दोन्ही गोलंदाजांव्यतिरिक्त शार्दुल ठाकूरने 2 तर रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 वाईड बॉल टाकला आहे.

त्यामुळे तब्बल 13 वर्षांनंतर भारतीय संघाने 20पेक्षा अधिक (24) वाईड धावा देण्याचा नकोसा विक्रम केला. यापुर्वी भारताने शेवटचे ऑक्टोबर 2007ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात 20 पेक्षा अधिक वाईट बॉलवर धावा दिल्या होत्या. त्यावेळी भारतीय संघाने 26 वाईड धावा दिल्या होत्या.

मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 193 धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना 26 धावा वाईड बॉलमुळे मिळाल्या होत्या. त्यावेळी भारताचे मध्यमगती गोलंदाज आरपी सिंगने 9 वाईड बॉल तर, वेगवान गोलंदाज जहीर खानने 5 वाईड बॉल टाकले होते. पण असे असले तरी भारतीय संघाने हा वनडे सामना 2 विकेट्सने जिंकला होता.

भारताने वनडेमध्ये सर्वाधिक वॉईड बॉल केनिया विरुद्ध बिस्ट्रोल येथे 1999ला झालेल्या वनडे सामन्यात टाकले होते. त्यावेळी भारताने वाईड बॉलवर 31 धावा दिल्या होत्या.

न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना 8 फेब्रुवारीला ऑकलँड येथे खेळण्यात येणार आहे.

वनडेत भारतीय संघाने टाकलेले सर्वाधिक वाईड बॉल – 

31 – विरुद्ध केनिया, ब्रिस्टोल, 1999

28 – विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, 2004

26 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई, 2007

25 – विरुद्ध वेस्ट इंडिज, 2007

24 – विरुद्ध न्यूझीलंड, हेमिल्टन, 2020 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---