आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर सर्वात धोकादायक संघ मानला जातो. रोहित शर्मा आणि कंपनीला घरच्या मैदानावर पराभूत करणे कोणत्याही विरोधी संघासाठी आव्हानात्मक असते. परंतू, बेंगळुरूमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
बेंगळुरू कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 गडी राखून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन आता सक्रिय झाले आहे. आता 24 ऑक्टोबरपासून पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने मोठी योजना आखली आहे.
गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांचा भारतीय क्रिकेट संघ पलटवार करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुण्यात पाहुण्या न्यूझीलंडला अडकवण्यासाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूझीलंड संघाला अडकवण्यासाठी पुण्यात काळ्या मातीची कोरडी खेळपट्टी बनवली जात असल्याची माहिती मिळत आहे. ही खेळपट्टी कोरडी आणि चेंडूला कमी उसळी देणारी राहील. त्यामुळे फिरकीपटूंना मोठा फायदा होणार आहे.
भारतीय संघ येथे 3 फिरकीपटूंसोबत खेळू शकतो. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरचाही भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. संघ व्यवस्थापनाला फिरकी गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही मजबूत करायची आहे. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. कारण, चौथ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा करणे अवघड जाईल.
दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्या दोघांना माझा तिरस्कार वाटायचा, कारण…”, स्टिव्ह स्मिथचे सहकारी खेळाडूंवर आरोप
WTC FINALच्या बाहेर पडले ‘हे’ 4 संघ! उर्वरित सामने जिंकूनही नाही फायदा?
“बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळणार पण…” पुनरागमनाबद्दल मोहम्मद शमी काय म्हणाला?