---Advertisement---

पुजारा की रहाणे? कोणाची जागा घेणार विराट? प्रशिक्षकांनी दिले उत्तर

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 12:50 AM
ajinkya-pujara
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या भक्कम स्थितीत आहे. सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला आहे आणि न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी २८० धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी ९ विकेट्स घेणे गरजेचे आहे. असे असले तरी, पहिल्या सामन्यादरम्यान भारताच्या वरच्या फळीतील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने अपेक्षित प्रदर्शन केले नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार असल्यामुळे, या दोघांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अशात संघ व्यवस्थापनासमोर या दोघांपैकी कोणाला मैदानाबाहेर बसवायचे याचा पेच निर्माण झाला आहे.

पुजारा आणि रहाणेविषयी विक्रम राठोर यांनी दिली महत्वाची प्रतिक्रिया

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोणत्या खेळाडूची जागा घेणार याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे. संघ व्यवस्थापनासमोरही हा एक मोठा पेच निर्माण झाला आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी याबाबत महिती दिली आहे. सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राठोर म्हणाले की, “निश्चितच तुम्हाला वरच्या फळीकडून योगदान हवे आहे. मात्र, ज्या क्रिकेटपटूंचा (रहाणे आणि पुजार) तुम्ही उल्लेख केला. त्यांनी ८० (रहाणे ७९) आणि ९० (९१) कसोटी सामने खेळले आहेत. निश्चितच एवढे सगळे सामने खेळून त्यांनी आमच्यासाठी चांगले योगदान दिले आहे.”

राठोर यांनी रहाणे आणि पुजारा नक्कीच चांगली खेळी करतील, असा विश्वास देखील व्यक्त केला. ते म्हणाले की, “आम्हाला वाटते की, दोघे यावेळी खराब काळातून जात आहेत. पण आम्हाला वाटते की, मागच्या काळात त्यांनी आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण खेळ्या केली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ते पुनरागमन करतील आणि आमच्यासाठी महत्वाची खेळी खेळतील.”

रहाणे आणि पुजाराने या संपूर्ण वर्षात खूपच निराशाजन प्रदर्शन केले आहे. रहाणेने यादरम्यान १९ आणि पुजाराने ३० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अशात संघ त्यांना अजून कुठपर्यंत संधी देणार असा प्रश्न विचारल्यानंतर राठोर म्हणाले की, “मला नाही वाटत तुम्ही, यासाठी संख्या निश्चित करू शकता. हे अवलंबून आहे की, कोणत्या स्थितीत आहोत आणि संघाला काय करण्याची गरज आहे.”

कोहलीसाठी कोणता खेळाडू जागा मोकळी करणार ?

कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांतीवर होता. पण, मुंबईच्या वानखडे स्टेडियावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत मात्र तो उपस्थित असणार आहे. अशात विराटसाठी कोणत्या भारतीय खेळाडूला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले जाईल, असा प्रश्न विचारला गेला. मात्र, राठोर यांना या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर दिले नाही. ते म्हणाले की, “कर्णधार पुनरागमन करणार आहे. हे पुढच्या सामन्यात होणार आहे. जेव्हा आम्ही मुंबईला पोहोचू, यावर निर्णय घेऊ. आता लक्ष या सामन्यावर आहे. या सामन्याचा एक दिवस राहिला आहे आणि सामना जिंकावा लागणार आहे. जेव्हा मुंबईत पोहोचू, तेव्हा यावर चर्चा करू.”

दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी भारतीय संघाने २३४ धावांवर डाव घोषित केला. दिवसाच्या शेवटी न्यूझीलंडला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडने चौथ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ४ धावा केल्या आणि एक विकेट देखील गमावला.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराना सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये निराशाजनक प्रदर्शन केले. पहिल्या डावात पुजाराने २६ आणि रहाणेने ३५ धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात पुजारा २२ आणि रहाणे फक्त ४ धावा करून बाद झाला. अशात विराटला संघात सामील करण्यासाठी या दोघांपैकी एकाला संघातून बाहेर केले जाण्याची दाट शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---