आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आयसीसी नॉकआऊट सामन्यात कोणत्या संघाच पारडं जड राहिल आहे? तर न्यूझीलंड संघाचं पारडं जड आहे. पण 2023 च्या वर्ल्ड कप मध्ये परिस्थिती वेगळी दिसून आली. त्या स्पर्धेच्या उपांत्यफेरी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यात भारतीय संघाच्या खेळावर लक्ष दिले. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2004 अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी पराभूत केले होते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 सालातील उपांत्यफेरी सामन्यात भारतीय संघाने साऊथ आफ्रिकेला 95 धावांनी पराभूत केले होते, पण अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2002 सालामध्ये उपांत्य फेरी सामन्यात भारतीय संघाने साऊथ आफ्रिकेचा दहा धावांनी पराभव केला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 च्या उपांत्य फेरी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका विरुद्ध 8 विकेट्सनी विजय मिळवला होता. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला होता. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या सेमी फायनल सामन्यात भारताने बांगलादेश ला 9 विकेट्सनी हरवले होते, पण अंतिम सामन्यात पाकिस्तान कडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 च्या उपांत्य फेरी सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला 4 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर न्युझीलंडने अंतिम सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला. पण त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये न्युझीलंड खेळामध्ये प्रभावी कामगिरी करू शकला नाही. किवी संघ नॉकआउट फेरीपर्यंत पोचू शकला नाही. तसेच आता न्यूझीलंडनेस उपांत्य फेरी सामन्यात साउथ आफ्रिकेला पराभूत केले आणि अंतिम सामन्यात संघाचे स्थान पक्के केले. तसेच आयसीसी नॉकआऊट सामन्यात भारत आणि न्यूझीलंड 4 वेळा आमने-सामने आलेले आहेत. ज्यामध्ये न्युझीलंडने भारतीय संघाचा 3 वेळा पराभव केला आहे.
हेही वाचा
गतविजेता आरसीबी संघ डब्ल्यूपीएल स्पर्धेमधून बाहेर, यूपी वॉरियर्सकडून दारुण पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रोहितसाठी शेवटचा वनडे? जाणून घ्या कारण
आयसीसी स्पर्धेत ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू; पाहा यादी






