आज (24 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व (Basin Reserve) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताचा दुसरा डाव सर्वबाद 191 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 9 धावांचे लक्ष्य मिळाले.
यावेळी भारताने दिलेल्या 9 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावाच्या दुसऱ्याच षटकात पूर्ण केले. तसेच सामना 10 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.
या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खूप निराश झाला. यावेळी कोहली म्हणाला की, हे स्पष्ट आहे की आम्ही मुळीच चांगला खेळ केला नाही. जर आम्ही पहिल्या डावात 220-230 धावांचे आव्हान दिले असते तर चांगले झाले असते. त्यामुळे दुसऱ्या डावातील धावांचे अंतरही कमी झाले असते.
युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉबद्दल (Prithvi Shaw) बोलताना विराट म्हणाला की, खेळाडूंवर नाराज होण्याची गरज नाही. भारताबाहेर शॉचा हा पहिलाच कसोटी सामना होता. तो मुळातच एक आक्रमक फलंदाज असून लवकरच फाॅर्ममध्ये परतेल.
मयंक अगरवालने (Mayank Agarwal) दोन्ही डावात चांगली कामगिरी केली. अगरवाल आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे दोनच फंलदाज असे आहेत ज्यांनी फलंदाजीत काही प्रमाणात चांगली कामगिरी केली,” असेही यावेळी चांगल्या कामगिरीबद्दल बोलताना विराट म्हणाला.
या सामन्यात दोन्हीही डावात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचा पहिला डाव 165 धावांवर सर्वबाद झाला. तर दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत आल्यानंतर रहाणे आणि हनुमा विहारी परत आले, तेव्हा भारताची धावसंख्या 4 बाद 144 धावा होती.
त्यावेळी अशी आशा होती की, हे दोन्ही खेळाडू चौथ्या दिवशी जास्त धावा करत न्यूझीलंडला मोठे आव्हान देतील. परंतु तसे काहीच झाले नाही.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज टीम साऊथी (Tim Southee) आणि ट्रेंट बोल्टने (Trent Boult) दुसऱ्या डावात अनुक्रमे 5 आणि 4 विकेट्स घेतल्या.
यशस्वी जयस्वालची आणखी एक दमदार खेळी; हा खेळाडू फ्लॉप…
वाचा- 👉https://t.co/mzQp1ZGX3p👈#म #मराठी #cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; हार्दिक पंड्या करतोय पुनरागमन…
वाचा- 👉https://t.co/5jApAiXLd1👈#म #मराठी #cricket #TeamIndia @hardikpandya7— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020