---Advertisement---

काय सांगता! टीम इंडिया एशिया कप खेळणार नाही?

---Advertisement---

यावर्षी पाकिस्तानमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये एशिया कप (Asia Cup 2020) होणार आहे. या कपचे आयोजन पाकिस्तान (Pakistan) करणार आहे. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे भारतीय संघ या कपमध्ये भाग न घेण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर बीसीसीआयने (BCCI) आतापर्यंत याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, जूनमध्ये होणाऱ्या एशिया कपमधील महत्त्वाच्या बैठकीत बीसीसीआय सहभागाबद्दल अंतिम निर्णय घेईल.

“जूनमध्ये होणाऱ्या एशिया कपमध्ये भाग घेण्यासंबंधी बीसीसीआयची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यानंतरच बीसीसीआय यावर अंतिम निर्णय घेईल. याविषयी बीसीसीआयला भारत सरकारची संमतीही मिळू शकते,” असे एका मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

यापूर्वी 2008मध्ये पाकिस्तानने या कपचे आयोजन केले होते. 2018 मध्ये एशिया क्रिकेट काऊंसिलच्या बैठकीत पाकिस्तानकडे एशिया कप 2020चे आयोजन सोपविण्यात आले होते. आता तब्बल 12 वर्षांनंतर पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम द्विपक्षीय मालिका 8 वर्षांपूर्वी 2012मध्ये खेळण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी 2 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 3 वनडे सामने खेळण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---